कोरोनाचे नवे ८१ रुग्ण; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:38+5:302021-03-26T04:24:38+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या नव्या ८१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार ...

81 new corona patients; Death of four | कोरोनाचे नवे ८१ रुग्ण; चौघांचा मृत्यू

कोरोनाचे नवे ८१ रुग्ण; चौघांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या नव्या ८१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६४५ झाली आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त चौघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये आजरा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

भुदरगड तालुक्यात एक, हातकणंगले बारा, कागल तीन, करवीर २०, पन्हाळा एक, नगरपालिका १२ तर कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात२३ नवे रुग्ण सापडले आहेत. इतर जिल्ह्यातून आलेल्या ९ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवसभरामध्ये ४५५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर १३९० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. १८३ अन्टीजेन टेस्ट करण्यात आली आहे.

आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील ६७ वर्षांच्या पुरुषाचा, याच तालुक्यातील सोहाळे येथील ८० वर्षाच्या वृद्धाचा, शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील ५६ वर्षाच्या महिलेचा आणि हातकणंगले तालुक्यातील ५८ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दिवसभरामध्ये ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: 81 new corona patients; Death of four