राज्यातील ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

By Admin | Updated: November 12, 2014 00:53 IST2014-11-12T00:53:20+5:302014-11-12T00:53:49+5:30

हंगामास वेग : पुणे विभागात सर्वाधिक कारखाने सुरू

81 factories in the state have been scratched | राज्यातील ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

राज्यातील ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

कोल्हापूर : पहिल्या उचलीचा तिढा अजून सुटलेला नाहीच परंतु त्यासाठी यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनीही आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केल्याने राज्यातील ८१ म्हणजे निम्म्याहून जास्त कारखाने सुरू झाले आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने १० नोव्हेंबरपर्यंत हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांची माहिती दिली असून त्यावरून हे स्पष्ट होत आहे. ऊस आंदोलन चळवळीच्या गेल्या एका तपाच्या संघर्षात यंदा पहिल्यांदाच असे घडले आहे की, पहिल्या उचलीबाबत काहीच ठोस हाती नसताना हंगाम मात्र जोराने सुरू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्णांतील शाहू (कागल) कारखान्याने २५३० रुपये तर शिरोळ तालुक्यातील ‘गुरुदत्त शुगर्स’ने २५३५ रुपये अशी एफआरपी एवढी एकरकमी पहिली उचल जाहीर केली आहे. अन्यथा राज्यभरातील एखादा अपवादवगळता एकाही कारखान्याने उचल किती देणार हे न सांगताच गाळप सुरू केले आहे व शेतकरीही त्यांना ऊस घालत आहेत. राज्यात यंदा सुमारे १६० कारखाने सुरू होतील, असा शासनाचाच प्राथमिक अंदाज आहे. त्यातील ८१ कारखाने आतापर्यंत सुरू झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३७ कारखाने खासगी आहेत. या कारखान्यांनी २६ लाख १९ हजार टन गाळप करून २१ लाख ४२ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. परतीचा पाऊस व जमिनीत अजूनही पावसाचा ओलावा असल्याने उतारा अगदीच कमी आहे. प्रतिवर्षी तो हंगामाच्या सुरुवातीला कमीच असतो. सर्वाधिक ४० कारखाने पुणे विभागात त्यातही पुणे व सोलापूर जिल्ह्णांत सुरू झाले आहेत. अमरावती व नागपूर विभागात मात्र अजून एकही कारखाना सुरू झालेला नाही. तिथे हंगाम घेणाऱ्या कारखान्यांची संख्याही अगदीच कमी असते.
केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. भाजप प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होती. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना सरकार विरोधात लगेच लढ्याचे अस्त्र उगारण्यास मर्यादा आल्याने त्यांनी सरकारला २५ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. ऊसदर निश्चित करणारे मंडळ कालच अस्तित्वात आले आहे. त्याची पहिली बैठक १५ नोव्हेंबरला होणार असली तरी त्यातून लगेच काही दर निश्चित होण्याची शक्यता नाही.
शिवाय सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने ठोस मदत केल्याशिवाय यंदा एफआरपीही एकरकमी देणे शक्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. आंदोलनामुळे गेल्यावर्षी हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. यंदा संघर्ष नसल्यामुळे तो किमान महिनाभर अगोदर सुरु झाला आहे. त्यामुळे अन्य काही तोटा झाला तरी लवकर गाळप होऊन शेतकऱ्यांना चांगले टनेज मिळेलच शिवाय जमीन लवकर रिकामी होणार असल्याने रब्बीचे पीकही पदरी पडेल अशी स्थिती आहे.

दृष्टिक्षेपात यंदाचा हंगाम
विभागसुरू झालेले कारखानेऊस गाळपसाखर उत्पादनउतारा
(कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल)(टक्के)
कोल्हापूर८ (२)००.९४००.४०४.२८
पुणे२१ (१९)१८.०७१५.९९८.८५
नगर१०(३)३.३७२.६४७.८२
औरंगाबाद२(७)१.४५०.८२५.६४
नांदेड३ (६)२.३६१.५७६.६८
एकूण४४(३७)२६.१९२१.४२८.१८

गत हंगामावर दृष्टिक्षेप२०१४२०१३
कारखाने सुरू१५७ १७० (६२)
(६१ खासगी)
ऊस गाळप लाख टन६७६.२६७००.२६
साखर लाख टन७७.००८०.००
सरासरी साखर उतारा११.४०११.४०


संभाव्य गाळप २०१५
कारखाने सुरू १६०
गाळप टन ७८५
साखर ८८ लाख टन

Web Title: 81 factories in the state have been scratched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.