शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी ८० शिक्षकांनी दिली खोटी माहिती -आॅनलाईन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:05 IST

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. यातील सर्व खोटेपणाचा अभ्यास करून ज्यांनी खरोखरच गंभीर अशी खोटी माहिती ...

ठळक मुद्देसर्वाधिक हातकणंगलेतील; कागदपत्रांची छाननी, दोषींना बसणार झटका

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. यातील सर्व खोटेपणाचा अभ्यास करून ज्यांनी खरोखरच गंभीर अशी खोटी माहिती दिली आहे अशा शिक्षकांच्या पुन्हा बदल्या करण्यात येणार आहेत तसेच काहीजणांविरोधात शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये गंभीर आजाराने आजारी असलेल्या शिक्षकांचा ‘संवर्ग १’ मध्ये समावेश होतो. दुसºया संवर्गामध्ये ‘पती-पत्नी सोय’ हा घटक येतो. तिसºया संवर्गामध्ये ‘सुगम-दुर्गम शाळा’ हा प्रकार येत असून चौथ्या प्रकारामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांनी आपली मूळ नियुक्ती तारीख लिहून सेवाज्येष्ठतेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने अपंग आणि आजारपणाचे दाखले घेतले आहेत तर काहींनी पती-पत्नी एकत्रिकरण नियमाचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळे केले आहेत. हे सर्व प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यातील दोषी आढळलेल्या ३७ शिक्षक शिक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ‘कारणे दाखवा नोटिसा’ बजावल्या होत्या.तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून सर्वच बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार छाननी केली असता ८० शिक्षकांना चुकीची माहिती भरल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व शिक्षकांची कागदपत्रे शिक्षण विभागाकडे जमा करण्यात आली आहेत.खोेटे अंतर, खोटा आजारकाहींनी नसलेला आजार आपल्याला किंवा मुलाला झाल्याचे सर्टिफिकेट घेतले आहे तर काहींनी अंतर दाखवताना जवळचे दाखवण्याऐवजी एस. टी. ज्या मार्गाने जाते तो मार्ग दाखवला आहे. काहींनी शाळा दुर्गम नसताना ती दाखवली आहे. अशा अनेक पद्धतीने शिक्षक, शिक्षिकांनी एकतर बदली सोयीची होण्यासाठी किंवा गैरसोयीची होऊ नये यासाठी हा कारभार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा