शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० ज्येष्ठांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST2020-12-13T04:38:47+5:302020-12-13T04:38:47+5:30

गारगोटी : माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस, भुदरगड यांच्या वतीने मुदाळ (ता भुदरगड) येथे खासदार ...

80 senior citizens felicitated on the occasion of Sharad Pawar's birthday | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० ज्येष्ठांचा सत्कार

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० ज्येष्ठांचा सत्कार

गारगोटी : माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस, भुदरगड यांच्या वतीने मुदाळ (ता भुदरगड) येथे खासदार शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ८० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करीत वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुदरगड तालुका संघाचे चेअरमन प्रा. बाळ देसाई होते.

या कार्यक्रमास राधानगरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पंडित केणे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, जिल्हा बॅंकेचे संचालक रणजितसिंह पाटील, ‘बिद्री’चे संचालक मधुकर देसाई, अशोक कांबळे, सूतगिरणीचे व्हाइस चेअरमन धोंडीराम वारके, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, ‘बिद्री’चे माजी संचालक सुनीलराव कांबळे, पंचायत समितीचे सदस्य संग्राम देसाई, अध्यक्ष बाळासाहेब जाधव, गारगोटीचे ग्रामपंचायत उपसरपंच स्नेहल कोटकर, सरपंच संगीता गुरव, मुदाळेचे माजी सरपंच विकास पाटील, शरद मोरे, विजयराव आबिटकर, आदी उपस्थित होते.

...............................

फोटो ओळ --- गारगोटी : मुदाळ येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना भुदरगड तालुका संघाचे चेअरमन प्रा. बाळ देसाई, पंडितराव केणे, संचालक रणजितसिंह पाटील, संचालक मधुकर देसाई, विश्वनाथ कुंभार, माजी सरपंच विकास पाटील, सुनील कांबळे, आदी उपस्थित होते.

चौकट-

मुदाळ येथील एस. एस. पाटील यांचे वय ८० असल्याने व पवारसाहेब यांचा वाढदिवसही ८० वा असल्याने पाटील यांच्या हस्ते केक कापून पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Web Title: 80 senior citizens felicitated on the occasion of Sharad Pawar's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.