शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पंचगंगेत रोज ८० एमएलडी सांडपाणी-- नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:04 AM

कोल्हापूर : एकेकाळी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देणाºया महानगरपालिका प्रशासनाला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करता न आल्याने थेट पंचगंगा नदीत सांडपाणी सोडून दिले जात होते. मात्र,

ठळक मुद्देदूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका;: सांडपाणी वाहिनी फुटल्याचा फटका. नदीच्या खालच्या भागात येणाºया गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे सध्या तरी

भारत चव्हाण ।कोल्हापूर : एकेकाळी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देणाºया महानगरपालिका प्रशासनाला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करता न आल्याने थेट पंचगंगा नदीत सांडपाणी सोडून दिले जात होते. मात्र, चार वर्षांपूर्वी राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून अद्ययावत असे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारल्यानंतरही तांत्रिक कारणामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अशक्य झालेले आहे. परिणामी, दररोज ८० एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. नदीच्या खालच्या भागात येणाºया गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे सध्या तरी काहीच होताना दिसत नाही.

अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन, गंभीर प्रश्नाकडेसुद्धा कानाडोळा करण्याची वृत्ती, अत्यावश्यक सेवेच्या कामाची निविदा काढण्यात झालेली चालढकल, अशा गोंधळजनक कामामुळे आज घडीला शहरातील सर्व प्रकारचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट पंचगंगा नदीत सोडून दिले जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन साथीचे, तसेच जलजन्य आजार फैलावण्याचा धोका वाढलेला आहे. अधिकाºयांच्या अशाच मानसिकतेतून काम सुरू राहिले, तर पुढील दोन महिने तरी सांडपाणी रोखण्यात प्रशासनाला यश येईल, याची सुतराम शक्यता नाही.

१३ सप्टेंबरला रात्री बारा वाजता शहरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहरात सखल भागात, तसेच ओढ्यांच्या काठावर राहणाºया नागरिकांच्या शेकडो घरात पाणी शिरले. त्याच रात्री जयंती नाला पंपिंग हाऊसजवळील सांडपाणी वाहून नेणारी एक पाईपलाईन लोखंडी पुलासह नाल्यात कोसळली. जयंती नाल्यातील दिवसभरातील सुमारे ६० एमएलडी सांडपाणी दसरा चौक येथील पंपिंग हाऊसमधून उचलून ते या पाईपलाईनद्वारे कसबा बावडा येथील अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नेण्यात येत होते; पण ही पाईपलाईनच कोसळली असल्याने सांडपाणी वाहून नेण्याचे काम बंद पडले आहे. परिणामी, नाल्यातून येणारे सर्व सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय पुढे पंचगंगा नदीत मिसळत आहे.दुधाळी नाल्यावर १८ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. शिवाय बापट कॅम्प व कदमवाडी येथील नाल्यावर बंधारे बांधून त्यातील १० एमएलडी सांडपाणी कसबा बावडा प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचे कामसुद्धा अपूर्ण आहे.यंत्रणा सक्षम, हाताळणी सदोषजयंती नाल्यातील सांडपाणी उपसा करण्याकरिता ४५० अश्वशक्तीचे चार पंप आहेत. नुकतीच या उपसा केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे; परंतु पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून ही यंत्रणाही बंद आहे. ७६ कोटींचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही अद्ययावत आहे; पण सांडपाणी मिळणे बंद झाल्यामुळे हे केंद्रही बंद ठेवावे लागले आहे. महानगरपालिकेची यंत्रणा सक्षम असूनही हाताळणी नीट नसल्याने नदीचे प्रदूषण वाढणार आहेमनपा प्रशासनाची क्षमता७५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे अद्ययावत प्रक्रिया केंद्र.केंद्रात १२.५० एम.एल.डी.चे सहा अद्ययावत बेडप्रक्रिया केंद्रात संगणकीय स्काडा पध्दतीचा वापरप्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाºया पाण्याचा वापर शेती, बांधकाम, उद्यानासाठीप्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणारा गाळ शेतकºयांना मोफतप्रक्रिया केंद्र अद्ययावत असल्याने साथीच्या आजारांचा धोका कमीप्रक्रिया के ंद्र सुरु राहिल्यास नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदतसध्याची परिस्थितीजयंती नाला ६० एमएलडी सांडपाणीदुधाळी नाला १८ते २० एमएलडी सांडपाणीबापट कॅॅम्प, कदमवाडी नाला १० ते १२ एमएलडी सांडपाणीसांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जात आहेसव्वा महिना झालातरी सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्णपणे बंद 

सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे. जयंती नाला येथून सांडपाणी उपसा बंद ठेवला आहे. नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी प्रमाणात व्हावे म्हणून ब्लिचिंग पावडरचा डोस वाढविण्यात आला आहे. याबाबत आम्ही प्रयत्न करीत असून, लवकरात लवकर हा प्रश्न सोडविला जाईल. - सुरेश कुलकर्णी, जल अभियंता.