शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

‘अंबाबाई’साठी पहिल्या टप्प्यात ८० कोटी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तत्त्वत: मंजूर : दर्शन मंडप, भक्त निवास, वाहनतळासह पायाभूत सुविधा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:55 AM

कोल्हापूरातील श्री अंबाबाई देवस्थान मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या ८० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्त्वत: मान्यता दिली.

कोल्हापूरातील श्री अंबाबाई देवस्थान मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या ८० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्त्वत: मान्यता दिली. विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात येणाºया तीन वाहनतळांवर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

कोल्हापूर : श्री अंबाबाई देवस्थान परिसर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गेले अनेक वर्षे रखडला होता. त्याला बुधवारी मुहूर्त लागला. मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथिगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या ८० कोटी रुपये खर्चाचे सादरीकरण केले. त्याला मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली.यावेळी या विकास आराखड्यातील कामांवर संनियंत्रणासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर समिती स्थापन करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, महापौर स्वाती यवलुजे मुख्य सचिव सुमित मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या सूचनाबिंदू चौक वाहनतळ ते मंदिर परिसर या पादचारी मार्गावर इलेक्ट्रिकल वाहने वापरावीत.भक्त निवासामध्ये सौरऊर्जेचा वापर होण्यासाठी सोय करावी.मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी.मंदिरात निर्माण होणाºया निर्माल्याचे तेथेच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करावी.फेब्रुवारीत कामाचा प्रारंभ शक्य!श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा मसुदा तयार करून आठवड्यातच शासकीय अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. या आराखड्याबाबत नगरविकास खात्याच्या अधिकाºयांनी महापालिकेचे नगरसचिव नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. त्यामुळे फेब्रुवारीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौºयावेळी आराखड्याप्रमाणे कामाचा प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अंबाबाई विकास आराखड्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मी शासनाचे आभार मानते. या कामासाठी महापालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील.- स्वाती यवलुजे, महापौरअंबाबाई विकास आराखड्यासाठी आता त्वरित निधीची पूर्तता करावी व तत्काळ कामाची सुरुवात करावी. घोषणा आणि अंमलबजावणी यामध्ये कोणताही फरक राहायला नको.-सतेज पाटील, आमदारपंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात विधानसभेच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासाचे आश्वासन दिले होते. ते भाजपाने पूर्ण केले.- अमल महाडिक, आमदार८० कोटींच्या तीर्थक्षेत्र आराखड्यातून दर्शन मंडप, पार्किंग अशी किरकोळ कामेच होतील. यात संपूर्ण शहरातील मैदाने, उद्याने, पार्किंगचा विचार शासनाने करणे गरजेचे होते. त्यामुळे मी अंशत: समाधानी आहे.- राजेश क्षीरसागर, आमदाया निर्णयामुळे पार्किंगचा प्रश्न निकाली लागेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यावरणपूरक ‘इलेक्ट्रीक कार’ची मोफत दर्शनापर्यंत सोय केली जाणार आहे. याकरिता चार कारची देवस्थान खरेदी करणार आहे.- महेश जाधव, अध्यक्ष,देवस्थान समिती