आठ लाखांची घरफोडी सांगलीतील घटना : दागिन्यांचा समावेश
By Admin | Updated: September 5, 2014 00:37 IST2014-09-05T00:36:25+5:302014-09-05T00:37:52+5:30
दहा तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट व एक तोळ्याचे नाणे सापडले. ते घेऊन चोरट्यांनी पलायन केले.

आठ लाखांची घरफोडी सांगलीतील घटना : दागिन्यांचा समावेश
सांगली : येथील व्यापारी भरत तेजाणींचे प्रताप चित्रपटगृहाजवळील घर फोडून चोरट्यांनी दहा तोळे सोन्याचे बिस्कीट व एक तोळ्याचे नाणे असा एकूण पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास केला. काल (बुधवार) रात्री सात ते नऊ या वेळेत चोरीचा हा प्रकार घडला. तेजाणी यांनी आज, गुरुवारी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजाणी यांचे कापड पेठेत टेलरिंग साहित्याचे दुकान आहे. प्रताप चित्रपटगृहाजवळ त्यांचे चार खोल्यांचे जुने घर आहे. वर्षापूर्वी ते मार्केट यार्डात बांधलेल्या नवीन घरात राहण्यास गेले आहेत. जुन्या घरात अजूनही साहित्य आहे. सध्या तेथे कोणीच रहात नाही. बुधवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीची सिमेंटच्या जाळीची खिडकी फोडून पहिल्या खोलीत प्रवेश केला. त्याला लागूनच दुसरी, तिसरी व चौथी खोली होती. तीन खोल्यांना कुलूप होते. त्याची कुलुपे चोरट्यांनी फोडली. मात्र या खोल्यात त्यांना काहीच मिळाले नाही. चौथ्या खोलीच्या दरवाजाला कुलूप नव्हते. केवळ कडी लावण्यात आली होती. कडी काढून ते खोलीत गेले व कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. त्यावेळी दहा तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट व एक तोळ्याचे नाणे सापडले. ते घेऊन चोरट्यांनी पलायन केले.