शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

'कोल्हापुरा'त ८ पदवीधर, 'हातकणंगले'त चौघे दहावी पास; लोकसभेच्या रिंगणातील उमेदवारांचे तपासले शिक्षण

By पोपट केशव पवार | Updated: April 25, 2024 13:25 IST

शाहू छत्रपती यांची इंदूरमधून पदवी, संजय मंडलिक एम.ए.बी.एड; कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांचे शिक्षण किती..जाणून घ्या

पोपट पवारकोल्हापूर : राजकारण आणि शिक्षण यांचा तसा फारसा संबंध येत नाही. अगदी अल्पशिक्षित असणाऱ्या नेत्यांनी राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी शिक्षित असावा यासाठी अलीकडच्या काळात नागरिकांकडूनच आग्रह धरला जात आहे. त्यातच अहिल्यादेवीनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना 'माझ्याएवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असे आव्हान दिले होते. त्यामुळे राज्यात उमेदवारांच्या शिक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चिला जात आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या शिक्षणाचा धांडोळा घेतला असता दोन्ही मतदारसंघातील अधिकतर उमेदवार पदवीधर असल्याचे दिसून आले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांपैकी ८ उमेदवार पदवीधर तर २ उमेदवार पदव्युत्तर आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे पदवीधर तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मंडलिक हे पदव्युत्तर आहेत.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही ७ उमेदवारांनी पदवी संपादित केली असून २ उमेदवार पदव्युत्तर आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात चार उमेदवार दहावी तर ३ उमेदवार बारावी पास आहेत. या दोन्ही मतदारसंघातील बहुतांश उमेदवारांनी कला शाखेतूनच आपले शिक्षण पूर्ण केल्याचे दिसते.

शाहू छत्रपती यांची इंदूरमधून पदवीशाहू छत्रपती हे बी.ए. असून त्यांनी इंदूर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. प्रा. संजय मंडलिक हे शिवाजी विद्यापीठातून एम.ए.बी.एड आहेत. या मतदारसंघातील बाजीराव खाडे हे एम.एस्सी ॲग्री आहेत. हातकणंगलेमधून लढणारे सत्यजित पाटील-सरुडकर यांनी केरळ विद्यापीठातून बी.एस्सी ॲग्रीची पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातील अपक्ष लढणारे सत्यजित पाटील हे एम. ई. (सिव्हिल) आहेत. राजू शेट्टी हे बागणी हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण आहेत. तर धर्यशील माने यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए.पूर्ण केले आहे.

असे आहे दोन्ही मतदारसंघातील चित्रशिक्षण   -  कोल्हापूर  -  हातकणंगले                        पदव्युत्तर :   -  २   -   २पदवी :  -  ८  -  ७पदवी अर्धवट शिक्षण : -  ३  -  ४बारावी : -  ४   -  ३अकरावी :  -  ०  -  २दहावी : -  २  -  ४नववी :  -  ०  -   ३आठवी :  -  ०  -  १सातवी : -  ३   -  ०आयटीआय : -  ० -  १

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Educationशिक्षण