शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:52 IST

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच आहे. शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीच माझा खटाटोप ...

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच आहे. शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीच माझा खटाटोप सुरू आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून ७५ टक्के शेतकऱ्यांनी शक्तिपीठास समर्थन दिले आहे. येणाऱ्या काळात १०० टक्के शेतकरी बांधव शक्तिपीठ महामार्गास समर्थन देतील, असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकातून केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्यावर टीका करणारे पत्रक प्रसिद्धीला दिले. त्याला क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सन २०१९ च्या निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने माझी बदनामी करण्यासाठी हे आरोप केले होते; पण आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. हे आरोप राजू शेट्टी यांनी सिद्ध करावेत; अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. 

वाचा- ढपल्यासाठी क्षीरसागर यांचा खटाटोप, राजू शेट्टी यांची टीका ‘खोटं बोल पण रेटून बोल,’ हीच त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. त्याचमुळे जिल्ह्यातील नागरिकांनी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे. येणाऱ्या काळातही महाविकास आघाडीला जनता त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल.

सध्या राजू शेट्टी यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक नाही. शेतकरी बांधवांना फसवून त्यांनी कारखानदारांशी युती केली आहे. त्यामुळे त्यांना पैशांच्या गोष्टी दिसत आहेत. त्याचमुळे शेतकरी बांधवांनी ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली हे गेल्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते.विकासाला विरोध करून शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचे काम राजू शेट्टी यांनी बंद करावे. अशा दिखाऊपणामुळे शेतकरी बांधव त्यांच्या पाठीशी राहिलेले नाहीत. याचे आत्मचिंतन त्यांनी करावे.