गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना 'ब्रिस्क'कडून ७५ लाख अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:47+5:302021-04-27T04:24:47+5:30
हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना ब्रिस्क कंपनीने ७५ लाख ३८ हजार ...

गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना 'ब्रिस्क'कडून ७५ लाख अदा
हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना ब्रिस्क कंपनीने ७५ लाख ३८ हजार इतकी रक्कम आज, सोमवारी अदा केली, अशी माहिती 'ब्रिस्क'चे सरव्यवस्थापक (टेक्निकल) वसंत गुजर यांनी दिली.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कंपनी कालावधीतील अंतिम पगार व ग्रॅच्युईटी मिळून एकूण १ कोटी ४९ लाख १२ हजार इतकी रक्कम देय होती. त्यापैकी ७४ लाख ५६ हजार इतकी रक्कम २० फेब्रुवारीला अदा केली होती.
उर्वरित ७५ लाख ३८ हजार इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या गडहिंग्लज शाखेत सोमवार (२६ एप्रिल) रोजी जमा केली आहे.
२०२०-२१ या हंगामात गाळपात आलेल्या ऊसाची एफआरपी २७६९ रुपये ६२ पैसे असतानाही कंपनीने प्रतिटन रुपये २८०० प्रमाणे संपूर्ण रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर तसेच तोडणी वाहतुकीची बिलेही त्यांच्या खात्यावर जमा केली आहेत, असेही गुजर यांनी सांगितले.
--------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना 'ब्रिस्क'चे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांच्या हस्ते ७५ लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, रणजीत देसाई, बाळासाहेब लोंढे, महादेव मांगले, प्रशासन अधिकारी श्याम हरळीकर, वित्त अधिकारी आनंदा लोहार आदी उपस्थित होते.
क्रमांक : २६०४२०२१-गड-०४