आजरा संघासाठी ७४.६६ टक्के मतदान
By Admin | Updated: July 27, 2015 00:27 IST2015-07-27T00:10:48+5:302015-07-27T00:27:59+5:30
आज मतमोजणी : ४२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; दोन्ही आघाडीकडून विजयाचा दावा

आजरा संघासाठी ७४.६६ टक्के मतदान
आजरा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाकरिता ७४.^^६६ टक्के इतके सरासरी मतदान झाले असून, विकास सेवा संस्था गटात व इतर संस्था गटात शंभर टक्के इतके मतदान झाले. मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पावसाने दिवसभर दिलेली उघडीप व निवडणुकीबाबत सभासदांना असणारी उत्सुकता यामुळे सकाळपासूनच मतदारांनी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. मतदारांना आणण्यासाठी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली होती. मतदारांच्या चहापानाची व्यवस्थाही ठेवण्यात आली होती.
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विकास सेवा संस्था गटातील राजर्षी शाहू विकास आघाडीने आपले समर्थक मतदार आणले, तर पावणेदहा वाजता रवळनाथ विकास आघाडीचे समर्थक मतदार आणण्यात आले.यावेळी शाहू आघाडीचे नेते श्रीपतराव देसाई, अशोक चराटी, आघाडीचे प्रमुख श्रीपतराव देसाई, नामदेव नार्वेकर उपस्थित होते. रवळनाथ विकास आघाडीचे सुधीर देसाई, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, उदय पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सकाळी आठपासून मोजणीअण्णा-भाऊ सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एकूण ३० टेबलांवर ही मतमोजणी करण्यात येणार असून, सर्वप्रथम विकास सेवा संस्था गट, त्यानंतर इतर संस्था गट व शेवटी व्यक्ती सभासद गटाची मतमोजणी होणार आहे.
फेटेच फेटे...
फटाकेच फटाके
विकास सेवा संस्था गटातील मतदारांना आणताना रवळनाथ विकास आघाडीने पांढरे, तर शाहू विकास आघाडीने भगव्या रंगाचे फेटे बांधून मतदारांना आणले. सेवा संस्था गटातील मतदानानंतर दोन्ही पॅनेलच्या समर्थकांकडून जोरदार आतषबाजी करण्यात आली. यामुळे गोंधळात भर पडत होती.चर्चा फुटीची
सेवा संस्था गटातून आणलेल्या एकमेकांच्या विरोधी मतदारांतील काही मतदार फोडल्याचा दावा दोन्ही गट करीत होते. नेमके काय घडले हे आज, सोमवारी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.