इचलकरंजीत ७४ पॉझिटिव्ह, पाचजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST2021-05-11T04:26:10+5:302021-05-11T04:26:10+5:30

इचलकरंजी : येथील विविध ३९ भागांतील ७४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मणेरे ...

74 positive in Ichalkaranji, five killed | इचलकरंजीत ७४ पॉझिटिव्ह, पाचजणांचा मृत्यू

इचलकरंजीत ७४ पॉझिटिव्ह, पाचजणांचा मृत्यू

इचलकरंजी : येथील विविध ३९ भागांतील ७४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मणेरे हायस्कूलजवळील ४९ वर्षीय पुरुष, पाटील मळा येथील ४५ वर्षीय, कारंडे मळा येथील ५८ वर्षीय पुरुष, बालाजीनगर येथील ५७ वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील ८५ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जवाहरनगर ६, यशवंत कॉलनी, स्वामी अपार्टमेंट, नदीवेस नाका, हनुमाननगर, कलानगर येथील प्रत्येकी ४, डेक्कन रोड, शहापूर, सोलगे मळा येथील प्रत्येकी ३, गांधी कॅम्प, बंडगर माळ, चांदणी चौक, महालक्ष्मीनगर शहापूर, गुरूकन्नननगर, पुजारी मळा, विक्रमनगर, गुजरी पेठ, सांगली रोड येथील प्रत्येकी २, शेळके मळा, रेणुकानगर झोपडपट्टी, दत्त मंदिरजवळ, पारिक कॉलनी, कोल्हापूर नाका, धान्य गल्ली, नारायणनगर, लक्ष्मी प्रोसेसर्सजवळ, मुरदंडे मळा, दाते मळा, मंगलमूर्ती टॉकीजजवळ, कारंडे मळा, मोठे तळे, विवेकानंद कॉलनी, नारायण मळा, मंगळवार पेठ, मधुबन सोसायटी, रिंग रोड, टाकवडे वेस, शाहू हायस्कूलजवळ व सर्वोदयनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत पाच हजार ६६४ जणांना लागण झाली असून, चार हजार ८१५ जण बरे झाले आहेत. ५८९ जण उपचार घेत असून, मृत्यू संख्या २६० वर पोहोचली आहे.

Web Title: 74 positive in Ichalkaranji, five killed