शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी ७२ जण इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:51+5:302021-07-07T04:31:51+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, चार विद्याशाखांचे अधिष्ठाता अशा विविध नऊ पदांसाठी ऑनलाईन स्वरूपात ...

शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी ७२ जण इच्छुक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, चार विद्याशाखांचे अधिष्ठाता अशा विविध नऊ पदांसाठी ऑनलाईन स्वरूपात पाचशे अर्ज दाखल झाले आहेत. त्यात कुलसचिवपदासाठी ७२ जणांनी अर्ज केले आहेत.
परीक्षा मंडळ व मूल्यमापन मंडळ, निरंतर शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरचे संचालकपदाची, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, आंतरविद्या शाखा, मानव्यशास्त्र शाखांचे अधिष्ठाता पदांचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी सांभाळत आहेत. आरक्षण, कोरोनामुळे या पदांच्या भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली. खुल्या प्रवर्गांमधील या रिक्त पदांच्या भरती करण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. त्यानुसार दि. ३ जूनपासून विद्यापीठाने या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली. ऑनलाईन अर्ज करण्याच्या शनिवार (दि. ३) पर्यंतच्या अंतिम मुदतीत या विविध नऊ पदांसाठी पाचशे अर्ज दाखल झाले आहेत. या पदांसाठी स्थळ प्रत (हार्ड कॉपी) विद्यापीठात जमा करण्याची मुदत सोमवार (दि. १२) पर्यंत आहे. ही मुदत पूर्ण झाल्यानंतर दाखल झालेल्या अर्जांची छाननी, मुलाखतीसह अन्य प्रक्रिया विद्यापीठाकडून येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी विद्यापीठाला पूर्णवेळ परीक्षा संचालक, अधिष्ठाता आणि संचालक मिळणार आहेत.