शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राधानगरीतून ७११२ तर अलमट्टीतून १५०००० क्युसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:58 IST

राधानगरी धरणामधून ७११२  तर अलमट्टी धरणातून १५९०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देराधानगरीतून ७११२ तर अलमट्टीतून १५०००० क्युसेक विसर्गराजाराम बंधाऱ्यात ४४.७ फूट पाणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणामधून ७११२  तर अलमट्टी धरणातून १५९०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, वारणा नदीवरील-चिंचोली,  माणगाव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज, सांगरूळ, कळे, कातळी व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, हरळी, खणदाळ, देवर्डे, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, गजरगांव व जरळी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, कोकरे, न्हावेली, उमगाव व कामेवाडी, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगांव गवसे, कानडे सावर्डे, अडकूर, तारेवाडी व कानडेवाडी, तुळशी नदीवरील- बाचणी, आरे व बीड, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे असे एकूण ९८ बंधारे पाण्याखाली आहेत.

नजिकच्या कोयना धरणात ६७.११ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९७.२७७ इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 72.42 दलघमी, वारणा 822.65 दलघमी, दूधगंगा 596.12 दलघमी, कासारी 69.91 दलघमी, कडवी 56.79 दलघमी, कुंभी 63.14 दलघमी, पाटगाव 92.14 दलघमी, चिकोत्रा 26.73 दलघमी, चित्री 42.74 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा  44.17  दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यातील पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 44.7 फूट, सुर्वे 40.8 फूट, रुई 70 फूट, इचलकरंजी 64 फूट, तेरवाड 56.6 फूट, शिरोळ 52.9 फूट, नृसिंहवाडी 51 फूट, राजापूर 40.6 फूट तर नजीकच्या सांगली 23.9  फूट व अंकली 29.6 फूट अशी आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर