शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 8, 2024 19:32 IST

२०१९ च्या तुलनेत १.१० टक्क्यांनी वाढ : करवीर सर्वात पुढे

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत अन्य जिल्ह्यांमध्ये कमी झालेले मतदान ही चिंतेची बाब असताना कोल्हापूर जिल्ह्याने आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा सर्वाधीक मतदानाचा विक्रम केला आहे. लोकसभेसाठी कोल्हापुरातून ७१.५९ टक्के तर हातकणंगलेमधून ७१.११ टक्के इतके मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत यंदा दोन्ही मतदारसंघात १.१० टक्क्यांनी मतदान वाढले आहे. करवीरमध्ये सर्वाधीक ७९.६१ टक्के मतदान झाले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली.

पुरोगामी विचारांचा वारसा आणि सजग नागरिकांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा ते लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये कायमच जिल्ह्यात सर्वाधीक मतदान होते. मतदानाची हीच परंपरा कायम राखत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकांमधील सर्वाधीक मतदानाची आकडेवारी मागे टाकत मंगळवारी कोल्हापूरकरांनी उच्चांकी मतदान केले.मंगळवारी उन्हाचा तडाखा असतानाही लोकशाहीचे कर्तव्य पार पडण्यासाठी जिल्ह्यातील लाखो मतदार घराबाहेर पडले. दुपार वगळता सकाळी व सायंकाळी ५ नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले. अनेक केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जिल्हा निवडणूक विभागाने गेले सहा महिने मतदार याद्या अपडेट करून त्यातून मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची नावे कमी केली आहेत. तसेच मतदान जागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. नवमतदारांमध्ये वाढ झाली. त्याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला.

कोल्हापुरात करवीर पुढेकोल्हापूरसाठी झालेल्या मतदानात करवीर पुढे असून येथे ७९.६१ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान कोल्हापूर उत्तरमध्ये झाले असून येथे ६५.३१ टक्के मतदान झाले आहे.

हातकणंगलेच पुढेहातकणंगले मतदारसंघात हातकणंगलेमध्येच सर्वाधीक ७५.३२ टक्के मतदान झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर हे दाेन तालुके येतात. येथील शिराळा मतदारसंघात ६७.३९ टक्के मतदान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान