जिल्ह्यात आज ७० हजार डोस होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:46+5:302021-04-21T04:25:46+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरामध्ये लसीअभावी केवळ ७ हजार ८१० नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यामध्ये ३ हजार ८४० ...

70,000 doses will be available in the district today | जिल्ह्यात आज ७० हजार डोस होणार उपलब्ध

जिल्ह्यात आज ७० हजार डोस होणार उपलब्ध

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरामध्ये लसीअभावी केवळ ७ हजार ८१० नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यामध्ये ३ हजार ८४० जणांनी पहिला, तर ३ हजार ९७९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे; मात्र बुधवारसाठी ७० हजार डोस उपलब्ध होणार असल्याने बुधवारी आणि गुरुवारी लसीकरणाला वेग येणार आहे.

जिल्ह्यातील २३८ पैकी केवळ १२९ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. मंगळवारी सरासरी दैनंदिन लागणारी लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील लसीकरणाची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी एप्रिलच्या सुरुवातीला ३५ हजार डोस दिले जात होते; परंतु डोस कमी उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यात मंगळवारी १०९ केंद्रांवर लसीकरण झाले नाही. काही ठिकाणी लस संपल्याचे फलक लावण्यात आले होते.

Web Title: 70,000 doses will be available in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.