शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

Kolhapur Crime: पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीतील ७० हजार लंपास

By उद्धव गोडसे | Updated: March 28, 2023 15:05 IST

बँकेत धनादेश भरण्यासाठी गेला, तोपर्यंत चोरट्यांनी रक्कम लंपास केली

कोल्हापूर : शाहूपुरीतील पाच बंगला परिसरात एका बँकेसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीतील ७० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी (दि. २७) दुपारी अडीचच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांत हा प्रकार घडला. याबाबत संदीप शंकर नलवडे (वय २७, रा. धोंडेवाडी बीड, ता. करवीर) याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरीत एका ट्रेडिंग कंपनीत काम करणारा कर्मचारी संदीप नलवडे हा सोमवारी दुपारी मार्केट यार्ड परिसरातील एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. बँकेतून काढलेली ७० हजार रुपयांची रक्कम त्याने दुचाकीच्या डिकीत ठेवली. त्यानंतर पाच बंगला परिसरातील एका बँकेत धनादेश भरण्यासाठी तो गेला. बँकेच्या बाहेर दुचाकी पार्क करून तो सात मिनिटांत बँकेतून बाहेर आला. त्यावेळी त्याला दुचाकीच्या डिकीचे झाकण उघडे दिसले. डिकीतील रकमेची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.दोघांचे कृत्यपोलिसांनी बँकेच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, दोन चोरट्यांनी अवघ्या पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीचे लॉक तोडून रक्कम घेऊन पलायन केल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेज धूसर असल्यामुळे चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. मार्केट यार्डपासून पाठलाग करून चोरट्यांनी पैसे लांबवले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी