शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: इचलकरंजीचे ७० टक्के दूषित पाणी थेट पंचगंगेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 17:26 IST

दोन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

अतुल आंबीइचलकरंजी : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आजतागायत पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने सुमारे ७० टक्के मैलामिश्रित सांडपाणी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळणे सुरूच आहे. त्यामुळे कोल्हापूरनंतर इचलकरंजीच प्रदूषणाला जबाबदार मुख्य घटक ठरत आहे. उन्हाळ्यात जाणवणारी प्रदूषणाची तीव्रता आता पावसाळा सुरू झाल्यानंतर दुर्लक्षित होते. परिणामी, किमान डिसेंबरपर्यंत नदी प्रदूषणाचा विषय दुर्लक्षित राहतो. याकडे कोणी गांभीर्याने पाहणार आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. इचलकरंजी शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. नव्याने निर्माण होणाऱ्या २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) चे काम संथगतीने सुरू आहे, तर जुनी २० दशलक्ष लिटर क्षमतेची यंत्रणा कालबाह्य असून, वारंवार बंद पडत असते. परिणामी, दररोज निर्माण होणाऱ्या ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यातील सुमारे ७० टक्के सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळते. दिखाव्यापुरती तोकडी यंत्रणा सध्या कार्यान्वित असून, अनेकवेळा त्याच त्या पाण्यावर प्रक्रिया होते, तर संपवेल बंद पडला की पाणी थेट नदीत मिसळते.शहरातील औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नऊ दशलक्ष लिटर क्षमतेचा सीईटीपी (रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) कार्यान्वित आहे. परंतु, नवीन नियमानुसार त्यांना झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) प्रकल्प राबविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मैलखड्डा परिसरात जागा घेऊन १५ दशलक्ष लिटर क्षमतेचा झेडएलडीचा प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली असून, पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचे काम सुरू होणार आहे.एकूणच सध्या इचलकरंजी शहरातून प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. तक्रार प्राप्त झाल्यानंतरच या विभागाकडून पाहणी आणि नमुने घेतले जातात. या नमुन्याचे पुढे काय होते, याचा कधीच शोध लागत नाही. त्याचबरोबर पुढील सोपस्कर पूर्ण करण्यासाठी म्हणून मंडळाकडून महापालिकेला नोटीस दिली जाते. १५ वर्षात अशा कित्येक नोटीस पालिकेला मिळाल्या असतील. परंतु, वीस दशलक्ष लिटरच्या नवीन एसटीपी प्रकल्पाच्या मंजुरीव्यतिरिक्त काहीच महत्त्वपूर्ण सुधारणा अथवा उपाययोजना दिसत नाही.

कलानगर ओढ्यावर प्रक्रिया नाहीचसध्या शहरातील काळा ओढा, कलानगर चंदूर ओढा यातून शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. त्याचबरोबर काही रंगण्यांचे (साध्या कापडाला रंगीत करणारे छोटे कारखाने) पाणी ओढ्यातून नदीत मिसळते.

दोन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेतमहापालिकेने कलानगर ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेरा दशलक्ष लिटरचा आणि टाकवडे वेस येथील जागेत आणखीन १९ दशलक्ष लिटरचा असे दोन एसटीपी शासनाकडे मागितले आहेत. ते दोन्ही प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.दृष्टिक्षेपात

  • इचलकरंजी शहर लोकसंख्या - सुमारे चार लाख
  • नळजोडणी - ४३ हजार
  • औद्योगिक नळजोडणी - तीन हजार
  • कूपनलिका - ७२०, २१० हातपंप
  • खासगी कूपनलिका - २५००
  • निर्माण होणारे सांडपाणी - ४० (दशलक्ष लिटर)
  • सध्याचा एसटीपी - २० (दशलक्ष लिटर)
  • नवीन मंजूर एसटीपी - २० (दशलक्ष लिटर)
  • मंजूर - प्रक्रियेत १३ व १९ (दशलक्ष लिटर)
  • सध्याचा सीईटीपी - ९ (दशलक्ष लिटर)
  • मंजूर प्रक्रियेतील झेडएलडी - १५ (दशलक्ष लिटर) 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण