जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर पहिल्याचदिवशी ७ हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:28+5:302021-09-04T04:29:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीवर पहिल्याचदिवशी दोन गटांतून ७ हरकती दाखल झाल्या. मतदार ...

जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर पहिल्याचदिवशी ७ हरकती
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीवर पहिल्याचदिवशी दोन गटांतून ७ हरकती दाखल झाल्या. मतदार यादीतील मृत प्रतिनिधीचे नाव बदलण्याबाबत या हरकती घेण्यात आल्या आहेत.
जिल्हा बँकेची ७६४७ पात्र मतदारांची यादी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी प्रसिध्द केली. या यादीवर शुक्रवारपासून हरकती घेण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याचदिवशी दोन गटांतून सात हरकती दाखल झाल्या आहेत. गट क्रमांक १ विकास संस्था गटातून पाच, तर गट क्रमांक ४ इतर संस्था गटातून दोन अशा ७ हरकती दाखल झाल्या आहेत. संबंधित संस्थांनी आपल्या प्रतिनिधीच्या नावाचा ठराव दाखल केल्यानंतर ते मृत झाले आहेत. त्यामुळे ही नावे बदलण्याबाबत संस्थांनी हरकती घेतल्या आहेत.
हरकती १३ सप्टेंबरपर्यंत दाखल करायच्या आहेत. दाखल हरकतींवर २२ सप्टेंबरपर्यंत निकाल द्यायचा आहे. २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिध्द करायची आहे.