कोरोनाचे नवे ७ रुग्ण, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST2021-01-03T04:24:48+5:302021-01-03T04:24:48+5:30

कोल्हापूर : गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे केवळ नवे ७ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. मात्र, तिघांचा मृत्यू झाला ...

7 new corona patients, 3 deaths | कोरोनाचे नवे ७ रुग्ण, ३ मृत्यू

कोरोनाचे नवे ७ रुग्ण, ३ मृत्यू

कोल्हापूर : गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे केवळ नवे ७ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. मात्र, तिघांचा मृत्यू झाला आहे.

कागल १, करवीर १, पन्हाळा १, कोल्हापूर महापालिका २ आणि नगरपालिका क्षेत्रात २ असे हे सात रुग्ण सापडले आहेत. दिवसभरामध्ये २२६ जणांची तपासणी करण्यात आली असून ८८५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १५२ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. आता केवळ ३९ कोरोना रुग्ण शिल्लक आहेत.

दरम्यान, एसएससी बोर्ड कोल्हापूर परिसरातील ८४ वर्षांच्या पुरुषाचा, मोहिते पार्क येथील ६१ वर्षीय महिलेचा आणि कागल तालुक्यातील हमिदवाडा येथील ९६ वर्षांच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: 7 new corona patients, 3 deaths