शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ७ कोटी कमिशन थकीत; १० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:05 IST

चार महिन्यांपासून प्रतीक्षा

कोल्हापूर : लाडकी बहीण आणि निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा मोठा फटका अन्य विभागांप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदारांनाही बसला आहे. गेल्या चार महिन्यांपासून शासनाने दुकानदारांना धान्य वितरणाचे कमिशन दिलेले नाही. जिल्ह्यात दर महिन्याला साडेबारा हजार टन धान्य वाटपाचे कमिशन १ कोटी ८७ लाख रुपये होते. त्याप्रमाणे चार महिन्यांची सात कोटींपेक्षा अधिक रक्कम अजून दुकानदारांना मिळालेली नाही.जिल्ह्यातील प्राधान्य व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना दर महिन्याला गहू व तांदूळ दिले जाते. जिल्ह्यात १ हजार ६३७ रेशन दुकानदार आहेत. त्यांच्यामार्फत सर्व लाभार्थ्यांना साडेबारा हजार टन धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी प्रति क्विंटलमागे दुकानदाराला १५० रुपये दिले जातात. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून दुकानदारांना कमिशनच दिले गेलेले नाही.

१० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा..कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या माध्यमातून रेशन दुकानदारांनी बुधवारी कमिशनबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना भेटून निवेदन दिले. कमिशन न मिळाल्याने रेशन दुकानदार व सेल्समन अडचणीत सापडले आहेत. दुकानाचे मासिक भाडे, लाईट बिल भागवणे अवघड झाले आहे. मार्च एंडिंगमुळे सर्व विभागातील बिल भागवण्यासाठी तगादा आहे. त्यामुळे दुकानदारांचे कमिशन लवकर जमा करा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांनी केली. पुढील दहा दिवसांत कमिशन न मिळाल्यास नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, कमिशन लवकर देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी लक्ष्मण माने, लेखा अधिकारी दिलीप कलकुटकी, अव्वल कारकून अक्षय ठोंबरे, आनंदा लादे, दीपक शिराळे, अरुण शिंदे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार