६९ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली
By Admin | Updated: September 4, 2015 00:48 IST2015-09-04T00:48:52+5:302015-09-04T00:48:52+5:30
घरफाळा गैरव्यवहार प्रकरण : सात अधिकाऱ्यांचाही समावेश; आयुक्तांचा दणका

६९ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली
कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाकडील घरफाळ्याच्या थकीत रकमेवरील दंडामध्ये मिळकतधारकांना अनाधिकाराने सूट देणाऱ्या ‘दानशूर’ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमध्ये सात अधिकाऱ्यांसह ६९ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या प्रत्येकी एक ते तीन वेतनवाढी कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचा पालिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या ताराराणी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एका व्यापारी व निवासी वापरातील मिळकतीचा घरफाळा व त्यावरील दंडव्याज माफ केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली होती. या प्रकारात अधिकाऱ्यांनी २२ लाख घरफाळ्याची थकबाकी १४ लाख भरून घेत उर्वरित दंडाची रक्कम माफ केली होती.
त्यामुळे आयुक्तांनी घरफाळा विभागाचे अधीक्षक दिवाकर कारंडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून दंडव्याज माफ करण्याच्या अशा घटना घडल्या आहेत का, याची चौकशी सुरू केली. गेल्या चार महिन्यांपासून ही चौकशी सुरू होती. सन २०१० ते २०१४ अशा चार वर्षांत कोणी कोणी, किती दंडव्याज माफ केले आणि त्याची रक्कम किती होते, या अनुषंगाने ही चौकशी झाली.
चार वर्षांत तब्बल २ कोटी ९१ लाख ९३ हजार ५४० रुपयांचे दंडव्याज माफ करून महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याची गंभीर बाब चौकशीत समोर आली.
त्याला प्रामुख्याने दिवाकर कारंडे, संजय भोसले, दिलीप कोळी, दीपक टिकेकर, सुरेश माने, दीपक सोळंकी, विश्वास कांबळे हे सात अधिकारी व ६९ कर्मचारी जबाबदार असल्याची बाबही स्पष्ट झाली. महानगरपालिकेच्या इतिहासात एवढ्या कर्मचाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे घोटाळेबाज कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांनी मनांवर घेतले तर घोटाळेबाजांना कसे वठणीवर आणता येते याचेही प्रत्यंतर त्यातून आले आहे. (प्रतिनिधी)
एक वार्षिक वेतनवाढ कायमपणे बंद (नावापुढे सूट दिलेली रक्कम)
१) शंकर कोळी : ४ लाख ९८ हजार ६३७
२) राजेंद्र वरके : ४ लाख ८९ हजार ६७६
३) डी. एच. पाटील : ४ लाख ८७ हजार ६२४
४) शिवानंद वडणगेकर : ३ लाख ९७ हजार २६७
५) धनंजय माने : ३ लाख ६६ हजार ३०८
६) शिवाजी मोहिते : ३ लाख ६१ हजार ३६
७) प्रकाश आयरे : ३ लाख ५८ हजार ६६५
८) संदीप कांबळे : ३ लाख ५६ हजार २०७
९) अरुण भोसले : ३ लाख ३५ हजार ८७५
१०) राजेंद्र दळवी : ३ लाख २८ हजार २८१
११) संतोष पोवार : २ लाख २२ हजार २३९
१२) रवींद्र साळोखे : ३ लाख २० हजार १११
१३) विक्रम पोवार : २ लाख ८४ हजार ४८९
१४) संजय पोवार : २ लाख ८३ हजार ३६०
१५) निशिकांत सरनाईक : २ लाख ६७ हजार ८३६
१६) प्रवीण भोसले : २ लाख ६५ हजार २३४
१७) सदाशिव पाटोळे : २ लाख ३७ हजार ९४७
१८) विश्वास पाटील : २ लाख ३४ हजार ३८
१९) भीमराव चौगले :२ लाख १० हजार ७१९
२०) राजेंद्र जाधव : १ लाख ९१ हजार ९५१
२१) सचिन इंगवले : १ लाख ५७ हजार ९२
२२) विश्वनाथ भोजे : १ लाख ४४ हजार ८७
२३) सुरेश जाधव : १ लाख ४१ हजार ५१५
२४) आनंद रुईकर : १ लाख ४१ हजार २२१
२५) संजय बोंद्रे : १ लाख १७ हजार २८४
२६) विशाल पंडत : १ लाख ११ हजार ७२०
२७) अनिल अडिवाल : १ लाख ०९ हजार ५१
२८) रमेश कांबळे : १ लाख ०७ हजार ६५५
२९) चंद्रकांत भोसले : १ लाख ०७ हजार ५६७
३०) सूर्यकुमार ढाले : १ लाख १ हजार ६५
३१) गणेश लोखंडे : ९७ हजार ७०
३२) सुरेश माने : ८५ हजार १७१
३३) संदीप लकडे : ८१ हजार १९८
३४) अनिल लाड : ७३ हजार ५०८
३५) दिलीप दळवी : ६५ हजार १७७
३६) शांताराम पोवार : ५९ हजार ४९५
३७) रमेश देसाई : ५७ हजार ५०९