शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

कोल्हापूर जिल्ह्यात ६८६ संस्था अवसायनात निघणार, सहकार विभागाचे अंतरिम आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:35 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : सहकार विभागाने कामकाज बंद असलेल्या संस्थांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध प्रकारातील ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : सहकार विभागाने कामकाज बंद असलेल्या संस्थांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध प्रकारातील २२०० संस्थांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, यातील ६७२ संस्थांना अंतरिम नोटीस बजावली आहे. तर गगनबावडा तालुक्यातील १४ संस्थांना अंतिम नोटीस बजावण्यात आली असून, या सगळ्या संस्था अवसायनात काढल्या जाणार आहेत.जिल्हा बँक व ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत मतदानासाठी गावपातळीवर संस्था काढल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी संस्था या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्यातही विकास संस्था व दूध संस्थांची संख्या सर्वाधिक आहे. पिशव्यातील (नुसत्या कागदोपत्री) संस्थांमुळे संख्या फुगते, परिणामी सहकार विभागावर त्यांच्या कामाचा ताण येतो. यासाठी २०१४ ला तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार शुद्धीकरणाची मोहीम हातात घेतली होती. त्यावेळी हजारो संस्था अवसायनात निघाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा ही शुद्धीकरण मोहीम हातात घेतली. ऑक्टोबरमध्ये सहकार विभागाने सर्व्हेशनाचा व जिल्हा निबंधक कार्यालयाला कालबद्ध कार्यक्रम तयार करून दिला. त्यानुसार गेली अडीच महिने सहकार विभागाचे काम सुरू होते. दुग्ध व इतर संस्था अशा २२०० संस्थांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या संस्थांची जागेवर जाऊन माहिती घेण्यात आल्या. यामध्ये दुग्धच्या ३२५ संस्था तर इतर ३४७ संस्थांना अंतरिम नोटिसा काढल्या आहेत. सहकार विभागाने २१ डिसेंबर २०२२ पर्यंत अवसायनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, ग्रामपंचायतीसह काही सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने विलंब झाला आहे. येत्या आठ दिवसांत अंतरिम नोटिसा काढलेल्या संस्थांकडे पाठपुरावा करून अंतिम नोटिसा लागू केल्या जातील. तसा अहवाल सहकार विभागाकडे पाठवावा लागणार आहे.

पन्हाळ्यातील सर्वाधिक १०४ संस्थाअंतरिम नोटिसा बजावलेल्या संस्थांमध्ये पन्हाळा तालुक्यातील तब्बल १०४ संस्थांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ हातकणंगले, भूदरगड, गडहिंग्लज, कागल व कोल्हापूर शहराचा क्रमांक लागतो. संस्था जास्त असणाऱ्या करवीर तालुक्यातील केवळ पाच संस्थांना नोटिसा लागू केल्या आहेत.

हुंबऱ्याला पुढारी अन्....ग्रामीण भागात सहकारी संस्थांवरच गावातील राजकारण अवलंबून असते. त्यामुळे लहान गावात तर हुंबऱ्याला पुढारी अन् तांब्याला दूध संस्था पाहावयास मिळतात.

१३४ संस्थांचा पत्ताच सापडेनासंस्थांचे सर्वेक्षण करताना काही संस्था बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र, १३४ संस्थांचा ठावठिकाणाच सापडत नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

अंतरिम नोटिसा काढलेल्या संस्था (दुग्ध वगळून)-

तालुका   -   संस्थागडहिंग्लज - ३३आजरा -   ०३भूदरगड - ३५चंदगड - २०शाहूवाडी  - ०३राधानगरी - १४पन्हाळा - १०४करवीर  -  ०५हातकणंगले -  ५६शिरोळ  - १६कागल -  १९कोल्हापूर शहर - २५ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर