शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ५ वर्षात ६७७७ प्रसुती, मानसेवी डॉक्टरांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:06 IST

स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा रिक्त असतानाही गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात गेल्या ५ वर्षात सुमारे ६७७७ स्त्रियांची प्रसुती झाली. यावरून सर्वसामान्य महिलांचा भरवसा शंभर खाटांच्या सरकारी दवाखान्यावरच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाममात्र मानधनावर सेवा बजावणाऱ्या मानसेवी स्त्रीरोगतज्ज्ञांचे कौतुकच करायला हवे.

ठळक मुद्देगडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ५ वर्षात ६७७७ प्रसुती, मानसेवी डॉक्टरांची कामगिरी स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही महिलांचा भरवसा शंभर खाटावरच

राम मगदूम

गडहिंग्लज : स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा रिक्त असतानाही गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात गेल्या ५ वर्षात सुमारे ६७७७ स्त्रियांची प्रसुती झाली. यावरून सर्वसामान्य महिलांचा भरवसा शंभर खाटांच्या सरकारी दवाखान्यावरच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाममात्र मानधनावर सेवा बजावणाऱ्या मानसेवी स्त्रीरोगतज्ज्ञांचे कौतुकच करायला हवे.२००५ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने या रूग्णालयाची उभारणी झाली. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व कागलसह सीमाभागातील गोरगरीब रूग्णांची, विशेषत: स्त्रियांची मोठी सोय झाली. परंतु, येथील फिजिशियनची जागा गेल्या ११ वर्षापासून तर स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा ५ वर्षांपासून रिक्त आहे. अनेकवेळा मागणी करूनदेखील या महत्वाच्या दोन्ही जागा अद्याप भरलेल्या नाहीत.डॉक्टर नसल्यामुळे महिलांची गैरसोय होवू नये, म्हणून परिसरातील स्त्रीरोगतज्ज्ञांना विनंती करावी आणि इच्छुकांना त्यांच्या सोयीनुसार व रूग्णालयाच्या गरजेनुसार बाह्य रूग्ण तपासणी व प्रसुतीकरिता पाचारण करण्यात यावे, अशी सूचना लोकप्रतिनिधींनी केली. तेंव्हापासून मानसेवी डॉक्टरांवरच स्त्रीरूग्ण विभागाचा डोलारा आहे.दरम्यान, लहानसहान कारणावरून कितीही तक्रारी झाल्या तरी याठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची आणि प्रसुतीकरिता हक्काने येणाऱ्या स्त्रियांची संख्यादेखील कमी झालेली नाही. त्यामुळे रूग्णालयावरील गरीबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी सातत्याने घ्यायला हवी. आकडे बोलतात..!गेल्या ५ वर्षात ३५७२ महिलांची नैसर्गिक प्रसुती तर ३२०५ महिलांची सिजेरियन प्रसुती झाली आहे. डॉ. गॉडद यांनी १४८८ तर डॉ. देशमाने यांनी १३२५ सिजेरियन आणि दोघांनी मिळून ३२० इतर मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.रिक्त पदे भराफिजिशियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञासह रूग्णालयातील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व प्रकाश आबीटकर यांनी नेटाने प्रयत्न करावेत. तसेच कामकाजासंदर्भात मार्गदर्शनासाठी वेळोवेळी संयुक्त बैठकादेखील घ्याव्यात.खच्चीकरण नको !मानसेवी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बर्नाडेट गॉडद व डॉ. ब्रम्हनाथ देशमाने हे दोघेही आजऱ्याचेच आहेत. गेल्या ५ वर्षातील त्यांचे काम आणि आजरा तालुक्यातून प्रसुतीसाठी आलेल्या महिलांची संख्या विचारात घेतल्यास त्यांच्याकडून आजरा तालुक्यातील महिलांची हेळसांड झाली असेल असे वाटत नाही. त्यामुळे किमान त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टर