पहिल्या दिवशी ‘अकरावी’चे ६६२ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:18+5:302020-12-05T04:54:18+5:30
या समितीने प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ९५८८ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली आहे. दुसरी फेरीत २७३६ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली ...

पहिल्या दिवशी ‘अकरावी’चे ६६२ प्रवेश
या समितीने प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ९५८८ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली आहे. दुसरी फेरीत २७३६ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया गुरुवारी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ६६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यात विज्ञान शाखेच्या ४३८, वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या ४१, वाणिज्य मराठी माध्यमाच्या ९५, तर कला मराठी माध्यमाच्या ८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कला इंग्रजी माध्यमासाठी पहिल्या दिवशी एकही प्रवेश निश्चित झाला नाही. प्रवेश प्रक्रिया समितीकडे कला शाखेतील एक आणि वाणिज्य शाखेत १८ तक्रारी दाखल झाल्या. या सर्व तक्रारी अमान्य झाल्या आहेत. विज्ञान शाखेसाठी २४ तक्रारींची नोंद झाली. त्यातील दोन मान्य, तर २२ तक्रारी अमान्य झाल्या आहेत.
चौकट
तक्रार नोंदविण्याकडे धाव
ऑनलाईन अर्जात पसंती क्रम नोंदवूनही प्रवेशासाठी हवे असणारे कॉलेज मिळाले नसलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी प्रवेश निश्चिती केली नाही. त्यांनी आपल्या पाल्यांसह ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी नेट कॅफे, इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी धाव घेतली. नोंद झाल्यापैकी बहुतांश तक्रारी या प्रवेश प्रक्रिया समितीने अमान्य केल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी प्रवेशाची पहिली फेरी संपेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.