शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात ६५ जण अपक्ष लढले, शिवाजी पाटील जाएंट किलर ठरले

By राजाराम लोंढे | Updated: November 26, 2024 14:01 IST

नाव, चिन्हातील साम्यामुळे अपक्षांनी घेतली लक्षवेधी मते

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत यावेळेला तब्बल ६५ अपक्षांनी आपले नशीब अजमावले. त्यापैकी ‘चंदगड’ मधून शिवाजी पाटील हे जाएंट किलर ठरले. त्यांच्यासह सर्वांनी २ लाख ४६ हजार ४३१ मते घेतली. त्याचबरोबर नाव व चिन्हातील साम्य असणाऱ्या अपक्षांनी घेतलेली मते लक्षवेधी आहेत.प्रत्येक निवडणुकीत अपक्षांचे गणित वेगवेगळे असते. राजकीय पक्षाने उमेदवारी न दिल्याने काहीजण रिंगणात उतरतात, तर काहींना पक्षीय उमेदवारांचे गणित बिघडवण्यासाठी मैदानात उतरवले जाते. यावेळेला ६५ अपक्ष रिंगणात होते. त्यापैकी शिवाजी पाटील यांना यश आले. ‘कोल्हापूर उत्तर’ मधून अपक्ष, पण नंतर काँग्रेसने पुरस्कृत केलेले राजेश लाटकर यांनी ८० हजार ८०१ मते घेतली. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांना अपेक्षित मतेही घेता आली नाहीत.

‘के. पी.’ यांच्या भेंडीला १,१४५ मतेराधानगरी मतदारसंघात उद्धव सेनेचे माजी आमदार के. पी. पाटील हे रिंगणात होते. त्यांच्या नावाचे साम्य असलेले के. पी. पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे उद्धव सेनेच्या ‘मशाल’ प्रमाणेच दिसणारी ‘भेंडी’ हे त्यांचे चिन्ह होते, त्यांना १,१४५ मते मिळाली.

‘शाहूवाडी’करांना ‘विनय’, ‘सत्यजित’ नावाचा चकमा‘शाहूवाडी’मध्ये जनसुराज्यचे विनय कोरे व उद्धव सेनेचे सत्यजित पाटील यांच्यात लढत झाली. येथे विनय कोरगावकर, विनय चव्हाण, सत्यजित बालासाो पाटील व सत्यजित विलासराव पाटील हे चार उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे विनय चव्हाण यांचा ‘झोपाळा’ हा कोरे यांच्या ‘नारळाची बाग’ तर सत्यजित बालासाो पाटील यांची ‘चिमणी’ व सत्यजित विलास पाटील यांचा ‘गळ्यातील टाय’ हे चिन्ह ‘मशाल’ सारखे दिसत होते. येथे चौघांनी ३००९ मते घेतली.

‘ट्रम्पेट’ने घेतली इचलकरंजी, कागलात मतेइचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे होते. त्याला साम्य असे ‘ट्रम्पेट’ चिन्ह सचिन आठवले यांचे होते, त्यांना २,१३३ मते मिळाली. तर, मदन कारंडे म्हणून दुसरे अपक्ष हाेते, त्यांना २३७ मते मिळाली. कागलमध्ये सत्ताप्पा कांबळे यांच्या ‘ट्रम्पेट’ २,३१९ मते घेतली.

मतदारसंघनिहाय अपक्षांनी अशी घेतली मते मतदारसंघ - अपक्ष  -  मते

  • चंदगड -  ११  -  १,१४,५८०  (शिवाजी पाटील यांच्यासह)
  • राधानगरी - ०३  -  १९,१०५
  • कोल्हापूर दक्षिण - ०५  - १,१२९
  • कागल  - ०६ - ३,८४४
  • करवीर - ०५ - ८५१
  • कोल्हापूर उत्तर - ०८ -  ८३,१३३  (राजेश लाटकर यांच्यासह)
  • शाहूवाडी - ०७  - ४,७२७
  • हातकणंगले - १० -  ९,३७०
  • इचलकरंजी - ०५  -  ५,३३५
  • शिरोळ - ०५ - ३,०६३
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरchandgad-acचंदगड