रुकडी येथे कोरोनाचे ६५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:54+5:302021-04-28T04:24:54+5:30
रुकडीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज अखेर ६५ रुग्णसंख्या बनली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता ग्रामपंचायत प्रशासन ...

रुकडी येथे कोरोनाचे ६५ रुग्ण
रुकडीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज अखेर ६५ रुग्णसंख्या बनली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता ग्रामपंचायत प्रशासन २ मेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवले आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
रुकडी गावाची लोकसंख्या पाहता येथे दररोज २०० लस उपलब्ध होत आहे. ही लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने नागरिक लससाठी पहाटेच आरोग्य उपकेंद्राचे वाट धरत आहेत.
लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरविणे शक्य नसल्याचे हेरले आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले असून दरम्यान, रुकडीसाठी अधिक लस उपलब्ध व्हावी यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतले आहेत. रुकडी परिसरात कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभे करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.