कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे ६२ हजार ५०० डोस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:54+5:302021-07-07T04:31:54+5:30
सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने लस देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या १२ लाख ...

कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे ६२ हजार ५०० डोस उपलब्ध
सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने लस देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या १२ लाख ७४ हजार ५४९ इतकी आहे. त्यातील ८ लाख ५४ हजार ४१४ नागरिकांना सोमवार (दि. ५) अखेरपर्यंत पहिला डोस दिला आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाकडून मिळालेल्या लसींचे वाटप करण्यात येते. यामध्ये शहरातील नागरिकांसाठी ऑनलाईन, तर ग्रामीण भागातील लोकांना ऑफलाईन पद्धतीने लसीसाठी नोंदणी केली जाते. ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणीची अडचण लक्षात घेऊन उपलब्ध लसींचा कोटा पाहून लोकांना लसीकरणासाठी कूपन दिले जातात. गेले काही दिवस जिल्ह्याला कमी प्रमाणात लस उपलब्ध झाली हे वास्तव आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त लसींचे डोस उपलब्ध होण्यासाठी आम्ही तीन मंत्री प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यासाठी मंगळवारी ६२ हजार ५०० कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर शहर तसेच १२ तालुक्यांना लसींचा कोटा उपलब्ध करून दिला आहे. या लसींमधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी लसीकरण झाले.
चौकट
कोल्हापूर शहरात लसीकरण
लसीकरणाचे नियोजन आज, बुधवारी महापालिकेने केले आहे. त्यामुळे या कोविशिल्ड डोससाठी कोल्हापूर शहरात ऑनलाईन नोंदणी करून गुरुवारी (दि. ८ जुलै) कोविशिल्ड डोसच्या लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे.
पाॅइंटर
तालुकानिहाय आणि शहरासाठी उपलब्ध झालेला लसीचा कोटा
आजरा -२,५००
भुदरगड -३,१००
चंदगड -३,८००
गडहिंग्लज - ४,४७०
गगनबावडा - ७००
हातकणंगले – ११,१००
कागल - ४,५००
करवीर - ६,८६०
पन्हाळा - ३,९६०
राधानगरी - ३,८४०
शाहूवाडी - ३,५५०
शिरोळ – ६,२५०
सीपीआर रुग्णालय – ३००
सेवा रुग्णालय, बावडा- ५००
कोल्हापूर महानगरपालिका - ७,०७०