बांधकामावरून ६१ हजाराचे साहित्य चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST2021-06-23T04:17:47+5:302021-06-23T04:17:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजारामपुरी १२ वी गल्लीत बांधकामाच्या समोर उघड्या जागेत पोत्याखाली झाकून ठेवलेले सुमारे ६१ हजार ...

61,000 materials stolen from construction | बांधकामावरून ६१ हजाराचे साहित्य चोरी

बांधकामावरून ६१ हजाराचे साहित्य चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राजारामपुरी १२ वी गल्लीत बांधकामाच्या समोर उघड्या जागेत पोत्याखाली झाकून ठेवलेले सुमारे ६१ हजार रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य अज्ञाताने चोरून नेले. चोरीला गेलेल्यामध्ये सळई, लोखंडी सिकंदर याचा समावेश आहे. या चोरीबाबत विलास आण्णाप्पा मोहिते (राजारामपुरी १४ वी गल्ली) यांनी चोरीची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

दोन ठिकाणांहून दुचाकींची चोरी

कोल्हापूर : रिंगरोडवरील मनोरा हॉटेल तसेच पाचगाव या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरीला गेल्या. शिवानंद रामाप्पा दळवई (रा. पूजा प्रिया पार्क, उचगाव, ता. करवीर) याने पाचगाव येथील जाधव पार्कमधील हनुमान मंदिरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली. याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. तर रिंगरोडवरील मनोरा हाटेलनजीक उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार आसिफ मुजावर (रा. आयसोलेशन हॉस्पिटलनजीक) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: 61,000 materials stolen from construction