नृसिंहवाडीच्या नृसिंह ग्रामीण पतसंस्थेत ६१ लाखांचा अपहार

By Admin | Updated: February 26, 2015 00:22 IST2015-02-26T00:21:56+5:302015-02-26T00:22:30+5:30

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह २१ जणांविरुद्ध गुन्हा

61 lakhs of rupees in Nrusinhawadi village credit society | नृसिंहवाडीच्या नृसिंह ग्रामीण पतसंस्थेत ६१ लाखांचा अपहार

नृसिंहवाडीच्या नृसिंह ग्रामीण पतसंस्थेत ६१ लाखांचा अपहार

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ६१ लाख ६१ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार लेखा परीक्षक शिवदास भिवसन सोनवणे (वय ४५, रा. सम्राट कॉलनी, कोल्हापूर) येथील शिरोळ पोलिसांत दिली आहे. अपहार प्रकरणामुळे नृसिंहवाडीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.संस्थेचे अध्यक्ष मोहन दत्तात्रय गवंडी, उपाध्यक्ष बाळासाहेब दादा अणुजे, संचालक प्रकाश दादू साळुंखे, मुकुंद सखाराम पुजारी, तानाजी दादू निकम, राजेंद्र भाऊसो अणुजे, वसंतराव सदाशिव मोरबाळे, दत्तात्रय गजानन रूक्के-पुजारी, सुभाष बाळू रूकडे, महिपती रामचंद्र भोसले, सुगंधा दत्तात्रय कदम, शालन वसंतराव धनवडे, सुकुमार आण्णा नंदगावे (मृत), दत्तात्रय परशराम धनवडे (मृत), चित्राबाई चुडाप्पा कांबळे (मृत), सचिव मधुकर श्रीनिवास कुलकर्णी, क्लार्क - संजय आण्णासाहेब खरोसे, आदगोंडा नेमगोंडा पाटील, वंदना प्रवीण सुतार, कॅशियर सदानंद शामराव पवार, कल्पना दिलीप चव्हाण (सर्व रा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, श्री नृसिंह ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००८ या कालावधीत चाचणी लेखा परीक्षण करण्यात आले होते. या कालावधीत संचालक मंडळ, सचिव व कर्मचारी यांनी सहकारी संस्थेचा कायदा, त्या खालील नियम तसेच मंजूर पोटनियमातील तरतुदीप्रमाणे काम करणे आवश्यक होते. मात्र यामध्ये गैरव्यवहार व अपहार करून तो लपविण्याच्या उद्देशाने नियमबाह्य खर्च करून संचालक मंडळ व कर्मचारी यांनी स्वत:च्या नावावर मर्यादेपेक्षा जादा रकमेची कर्जे उचल केली आहेत. हिशोबामध्येही अनेक त्रुटी ठेवून चुकीचा जमाखर्च करणे, खोट्या नोंदीशिवाय चुकीचे आर्थिक पत्रके तयार करून सभासदांची दिशाभूल केली आहे.
ठेवी नसताना हितसंबंधितांच्या नावावर ठेवतारण कर्ज दाखवून संगनमत करून संस्थेच्या निधीचा गैरवापर केला आहे. विशेष म्हणजे याबाबत कारवाई होऊ नये असा ठराव करून स्वत:च्या नावावर कर्जे, खर्च टाकून ६१ लाख ६१ हजार ९६ रूपये ६८ पैसे इतक्या रकमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लेखापरीक्षक सोनवणे यांच्या तक्रारीनुसार संस्थेच्या अध्यक्षासह २१ जणांविरुद्ध शिरोळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. दरम्यान, २१ पैकी ३ संचालक मृत आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार चळचुक करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 61 lakhs of rupees in Nrusinhawadi village credit society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.