शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५६ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:57 IST

राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ५६ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप करत पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

ठळक मुद्देराज्यातील ५६ साखर कारखान्यांची धुराडी थंडावलीगतवर्षीपेक्षा गाळप निम्म्यावर : साखर उत्पादनातही मोठी घट

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ५६ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप करत पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

गतवर्षी नऊ कोटी ५१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत गाळप अद्याप निम्म्यावर असून, अद्याप ९० कारखाने सुरू असले तरी गाळपाचा टप्पा पूर्ण होणे कठीण आहे.गेल्या हंगामात राज्यातील १०२ सहकारी व ९३ खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला होता.

मे २०१९ पर्यंत गाळप हंगाम सुरू राहून नऊ कोटी ५१ लाख ७९ हजार टन उसाचे गाळप झाले होते. मात्र यंदा महापूर, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने ऊस उत्पादकांचे कंबरडे मोडले होते. उसाचा तुटवडा व आर्थिक अडचणीमुळे यंदा तब्बल ४९ कारखाने सुरूच झाले नाहीत.सर्वाधिक फटका सोलापूर विभागातील १६, तर अहमदनगर विभागातील १२ कारखान्यांना बसून त्यांची धुराडी पेटू शकली नाहीत. त्याचा परिणाम उसाच्या गाळपावर दिसत असून, १५ मार्च २०२० पर्यंत १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप होऊन पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.मागील दोन हंगामातील उसाचे गाळप व साखरेचे उत्पादन पाहता आतापर्यंत निम्म्यावर गाळप राहिले आहे. उर्वरित कालावधीत मागील वर्षीच्या जवळपासही गाळप जाण्याची शक्यता धूसर आहे.विभागनिहाय उसाचे गाळप टनातविभाग              हंगाम २०१८-१९                           हंगाम २०१९-२०

  • कोल्हापूर        २ कोटी १५ लाख ९९ हजार           १ कोटी ७४ लाख ८० हजार
  • पुणे                 २ कोटी ६ लाख ७० हजार             १ कोटी ३२ लाख ४१ हजार
  • सोलापूर          २ कोटी ३ लाख ५० हजार             ६७ लाख ५९ हजार
  • अहमदनगर    १ कोटी ४८ लाख ६ हजार             ५५ लाख २७ हजार
  • औरंगाबाद       ८८ लाख ७३ हजार                      ३५ लाख १८ हजार
  • नांदेड              ७८ लाख ६२ हजार                      २७ लाख ६४ हजार
  • अमरावती         ३ लाख २६ हजार                        ४ लाख ५ हजार
  • नागपूर              ६ लाख ९२ हजार                        ४ लाख ११ हजार 
  • एकूण          ९ कोटी ५१ लाख ७९ हजार            ५ कोटी १ लाख ५ हजार

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर