गडहिंग्लज तालुक्यात ६ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:21+5:302021-01-08T05:17:21+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ५०पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्यामुळे बहुतेक गावात ...

6 gram panchayats in Gadhinglaj taluka without any objection | गडहिंग्लज तालुक्यात ६ ग्रामपंचायती बिनविरोध

गडहिंग्लज तालुक्यात ६ ग्रामपंचायती बिनविरोध

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ५०पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्यामुळे बहुतेक गावात बहुरंगी लढती होत आहेत.

हसूरचंपू येथे भाजप विरूद्ध राष्ट्रवादी, औरनाळमध्ये भाजपविरूद्ध आघाडी, माद्याळला राष्ट्रवादीविरूद्ध भाजप व संमिश्र आघाडी, नूलमध्ये जनता दल-राष्ट्रवादीविरूद्ध सर्वपक्षीय आघाडी, हेब्बाळ कानूलमध्ये राष्ट्रवादीविरूद्ध जनता दल, भाजप व युवक आघाडी अशी चौरंगी तर दुंडगे येथे तिरंगी सामना होत आहे.

इंचनाळ येथे राष्ट्रवादीविरूद्ध भाजप, लिंगनूरमध्ये राष्ट्रवादीविरूद्ध संमिश्र आघाडी, हेब्बाळ जलद्याळमध्ये तिरंगी, कानडेवाडी, उंबरवाडी, वाघराळी व तळेवाडीत दुरंगी लढती होत आहेत.

मुत्नाळमध्ये राष्ट्रवादी, भाजप व शेतकरी संघटना विरूद्ध अप्पी पाटील गट, जनता दल आघाडी व नवलाज गट यांच्यात तिरंगी सामना होत आहे.

हलकर्णीतील ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागेसाठी हत्तरकी गट विरूद्ध राष्ट्रवादी व व्हसकोटी गट अशी लढत होत आहे. बसर्गे येथेही ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ६ जागांसाठी सर्वपक्षीय आघाडीला अपक्षांनी आव्हान दिले आहे. तेरणी येथे चौरंगी सामना होत आहे. नरेवाडी येथे संभाजी पाटील व अंकुश रणदिवे गटात लढत होत आहे.

-------------------------------------

* बिनविरोध झालेली गावे

गिजवणे, दुगूनवाडी, तेगिनहाळ, इदरगुच्ची, चंदनकुड व सावतवाडी तर्फ नेसरी.

------------------------

फोटो ओळी : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ६८ वर्षांत पहिल्यांदाच बिनविरोध झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, बी. एन. पाटील, बाबासाहेब पाटील यांच्यासह नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रमांक : ०४०१२०२१-गड-०८

Web Title: 6 gram panchayats in Gadhinglaj taluka without any objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.