शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन ऑलआऊटमध्ये ६ फरार, ४ हद्दपार लागले हाती; ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई 

By उद्धव गोडसे | Updated: January 1, 2024 19:12 IST

पोलिसांचे थर्टी फर्स्ट रस्त्यावरच

कोल्हापूर : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविले. या कारवाईत पोलिसांच्या रेकॉर्डवरील १०२ गुन्हेगारांची झडती घेण्यात आली. विविध गुन्ह्यांत फरार असलेले सहा आरोपी पोलिसांना सापडले, तर हद्दपारीचा भंग केलेले चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले. जिल्ह्यात ७३ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये पाच हजार २०७ वाहनांची तपासणी केल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रविवारी (दि. ३१) दुपारपासूनच जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. ७३ ठिकाणी नाकाबंदी करून पाच हजार २०७ वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील १३३ मद्यपी वाहनचालक आणि ३७ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. सहा ठिकाणी अवैध दारू विक्रीवर छापा टाकून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान चार हद्दपार आरोपी पोलिसांना सापडले, तर सहा फरार आरोपींनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याची शक्यता असलेल्या संशयितांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. १४५ हॉटेल्स, १०३ लॉज आणि ३७ गेस्टहाऊसही तपासण्यात आले. सोमवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केल्यामुळे कुठेही अनूचित प्रकार घडला नाही, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.

पोलिसांचे थर्टी फर्स्ट रस्त्यावरचसर्व नागरिक नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना पोलिस मात्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर थांबून कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करीत होते. स्वत: पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह सहा उपअधीक्षक, सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, वाहतूक शाखा यांच्यासह ७० अधिकारी आणि ३३५ पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर होते. त्यांनी कर्तव्य बजावतच नव्या वर्षाचे स्वागत केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस