कोल्हापूर : गेले चार महिने पगारच न मिळालेल्या सीपीआरच्या ५८ डॉक्टर्स आणि सहाय्यक प्राध्यापकांनी उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दहा दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सर्वांनाच लेखी निवेदन दिल्यानंतरही पगार जमा न झाल्याने त्यांनी कोरोना काळात आता हे टोकाचे पाऊल उचलले आहे.राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे ५८ डॉक्टर्स आणि सहाय्यक प्राध्यापक तात्पुरत्या पद्धतीने कार्यरत आहेत. कोरोना काळात या सर्वांनी मोठी कामगिरी करून दाखवली आहे. परंतु मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यांचे वेतन या सर्वांना मिळालेले नाही. त्यामुळे घरखर्च चालवण्यापासून ते बँकांचे हप्ते भरण्यापर्यंत अनेक अडचणी या सर्वांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.त्यामुळे बुधवारपर्यंत चार महिन्यांचा पगार जमा झाला नाही, तर गुरुवारपासून हे सर्व जण बेमुदत संपावर जाणार आहेत. तसे लेखी पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहे. खरोखरच या सर्वांनी काम बंद केले तर सीपीआरच्या रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे.कोल्हापुरातच अडचणइतर वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन पीएए निधीतून केले जाते. मात्र, कोल्हापुरात या निधीतून वेतन देण्यास जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे हा पेच निर्माण झाला असून या सर्वांचा चार महिन्यांचा पगार थकला आहे. जर अन्य जिल्ह्यांत ज्या पद्धतीने वेतन अदा केले जाते ती पद्धत कोल्हापुरातच कशी चुकीची ठरते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.तर होणार गंभीर परिणामया ५८ डॉक्टरांनी काम बंद केले तर रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. ज्यांनी शेकडो हृदयशस्त्रक्रिया यशस्वी केल्या, ज्यांनी म्युकरमायकोसिसच्या शेकडो रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या, अशा डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे केवळ चार महिने पगार नाही म्हणून काम बंद करण्याची वेळ आली तर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.
सीपीआरचे ५८ डॉक्टर्स, सहा.प्राध्यापक उद्यापासून बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 10:46 IST
CprHospital Doctors Kolhapur : गेले चार महिने पगारच न मिळालेल्या सीपीआरच्या ५८ डॉक्टर्स आणि सहाय्यक प्राध्यापकांनी उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दहा दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सर्वांनाच लेखी निवेदन दिल्यानंतरही पगार जमा न झाल्याने त्यांनी कोरोना काळात आता हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
सीपीआरचे ५८ डॉक्टर्स, सहा.प्राध्यापक उद्यापासून बेमुदत संपावर
ठळक मुद्देसीपीआरचे ५८ डॉक्टर्स, सहा.प्राध्यापक उद्यापासून बेमुदत संपावरगेले चार महिने पगारच नाही, प्रशासनाचे दुर्लक्ष