शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीय पोलिसांचा बहाणा करून महिलेल्या ५७ हजाराला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:41 IST

Crime News, Police, kolhapur, crimenews अपघातील मृताचा विमा क्लेम काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून  महिलेला  ५७ हजारांचा गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसांच्या  विरोधात फसवणुकीचा  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही  घटना १७ जुलैला घडली होती.रात्री उशिरा गुुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देगोपनीय पोलिसांचा बहाणा करून महिलेल्या ५७ हजाराला फसवले तोतया पोलिसांच्या  विरोधात फसवणुकीचा  गुन्हा नोंद

पेठवडगाव :अपघातील मृताचा विमा क्लेम काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून  महिलेला  ५७ हजारांचा गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसांच्या  विरोधात फसवणुकीचा  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही  घटना १७ जुलैला घडली होती.रात्री उशिरा गुुन्हा नोंद करण्यात आला आहे.  याबाबत तानाजी पिलाजी सावंत (रा.तुकाई नगर,भादोले रोड, वडगाव) यांच्या विरोधात दुसर्यांदा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद सुरेखा कृष्णात जाधव (रा.निलेवाडी ता.हातकणंगले) यांनी दिली आहे. तपास सहाय्यक फौजदार डी टी पोळ यांनी दिली आहे. सावंत यास पोलिसांनी अटक केली आहे.   याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेवाडी (ता. हातकणंगले ) येथील आशा स्वयंसेवका असणार्या सुरेखा जाधव यांच्या मुलीचा ऐतवडे खुर्द (ता.वाळवा)येथे विवाह झाला होता.दरम्यान त्यांचा जावाई संदीप सर्जेराव पाटील यांचा १९ मे ला अपघातात मृत्यू झाला होता.दरम्यान तानाजी सावंत कामानिमित्त निलेवाडीला येत होता.या दरम्यान जाधव यांची सावंत बरोबर ओळख झाली.या ओळखी दरम्यान त्याने वडगाव पोलिसा ठाण्यात गोपनीय पोलिस आहे.तरी तुमच्या जावयाचे अपघाती क्लेम मिळवुन देतो अशी बतावणी केली.या कामासाठी साठ हजार रुपये खर्च येणार असे सांगीतले.त्यानंतर त्याने याकामासाठी १७ जुलै ला निलेवाडीतील घरात येवुन ५७ हजार रुपये घेवून पसार झाला.त्यानंतर सावंत याने कागदपत्रे दिली नाहीत. तसेच टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे फसवणुकी झाल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांत धाव घेतली.याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात या पुर्वी ही गुन्हा दाखल झाला आहे.या भामट्याबद्दल अनेक तक्रारी असून नागरीकांनी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन प्रशिक्षीणार्थी अधिकारी डॉ.धीरज बच्चु यांनी केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर