पहिल्या दिवशी ५७ जणांची नोंदणी

By Admin | Updated: October 17, 2014 00:39 IST2014-10-16T23:35:21+5:302014-10-17T00:39:30+5:30

फुटबॉल हंगाम : जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश

57 registration on first day | पहिल्या दिवशी ५७ जणांची नोंदणी

पहिल्या दिवशी ५७ जणांची नोंदणी

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने नव्या हंगामासाठी आज, गुरुवारपासून वरिष्ठ फुटबॉल संघाचे खेळाडू व संघ नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी १२ संघांसह एकूण ५७ खेळाडूंनी नोंदणी केली. के.एस.ए. कार्यालयात अध्यक्ष दि. के. अतितकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आॅन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, नितीन जाधव, राजेंद्र दळवी, आदी उपस्थित होते. आज २०१४-१५ या नव्या हंगामासाठी वरिष्ठ गटातील खेळाडूंसह संघाच्या नोंदणीस सुरुवात झाली. त्यामध्ये प्रॅक्टिस क्लब (अ) व (ब), दिलबहार तालीम मंडळ (अ) व (ब), शिवाजी तरुण मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (अ) व (ब), साईनाथ स्पोर्टस्, पॅट्रियट स्पोर्टस् गु्रप या संघातून एकूण ५७ खेळाडूंनी नोंदणी केली. पॅट्रियट संघाकडून नितीन पांढरे (मिरज), नईमुद्दीन सय्यद (औरंगाबाद), मोईद्दीन सय्यद (बीड) या जिल्ह्याबाहेरील खेळाडूंनी नोंदणी केली. (प्रतिनिधी)

या खेळाडूंनी बदलले संघ
वैभव राऊत (शिवनेरी) व अमित पोवार (साईनाथ) यांनी शिवाजीकडून, तर ओंकार पाटील व हृषीकेश जठार (पीटीएम ) यांनी प्रॅक्टिस क्लब (अ)कडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘शिवनेरी’च्या विक्रम शिंदे याने ‘खंडोबा’कडून व करण माने याने ‘प्रॅक्टिस’कडून नोंदणी केली.
पॅट्रियट, प्रॅक्टिस (ब)चे प्रमोशन
कै. अनिल मंडलिक स्पोर्टस् व रंकाळा तालीम मंडळ खालच्या गटात गेल्याने पॅट्रियट स्पोर्टस् गु्रप व प्रॅक्टिस क्लब (ब) यांना वरिष्ठ गटात प्रवेश मिळाल्याने हे दोन संघ प्रथमच लीग सामने खेळणार आहेत.

Web Title: 57 registration on first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.