५६२ पोलीसपाटील, कोतवाल पदांसाठी भरती
By Admin | Updated: November 20, 2015 00:39 IST2015-11-20T00:39:38+5:302015-11-20T00:39:50+5:30
सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध होणार : जिल्ह्यात आज सोडतीमधून आरक्षण जाहीर होणार

५६२ पोलीसपाटील, कोतवाल पदांसाठी भरती
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या कोतवाल व पोलीसपाटील पदांची भरती आता होणार आहे. दोन्ही मिळून ५६२ पदांसाठी ही भरती होत असून, यासाठी सोमवारी (दि. २३) जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. तर या पदांचे आज, शुक्रवारी सोडतीमधून आरक्षण काढले जाणार आहे.
ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यातील दुवा असणाऱ्या पोलीसपाटलांची जिल्ह्यासाठी १११८ पदे मंजूर असताना त्यापैकी फक्त ६३७ पदे भरली असून, ४८१ पदे रिक्तआहेत. त्याचबरोबर कोतवालांचीही जिल्ह्यात ८१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. पोलीसपाटील पदाची भरती प्रक्रिया संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. यासाठी त्यांची नियुक्ती प्राधिकर म्हणून निवड करण्यात आली आहे, तर कोतवाल पदाच्या भरतीचे अधिकार हे तहसीलदारांना देण्यात आले असून तेही नियुक्ती प्राधिकर आहेत. याकरिता निवड समिती तयार करण्यात आली असून, प्रांताधिकारी अध्यक्ष, तहसीलदार सदस्य सचिव तर नायब तहसीलदार सचिव आहेत.
भरतीसाठी पदांच्या आरक्षणाची सोडत आज, शुक्रवारी संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी काढली जाणार आहे. त्यानंतर भरतीसाठी सोमवारी (दि.२३) जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यानंतर उमेदवारांकडून ज्या-त्या प्रांताधिकारी कार्यालयस्तरावर अर्ज स्वीकारायला सुरुवात होणार आहे.
एक पोलीसपाटील आणि दोन गावांचा कारभार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीसपाटील भरती प्रक्रियेवरील स्थगिती अद्याप उठविली नसल्याने पोलीसपाटलांवर भार होत होता. या निमित्ताने हा भार हलका होईल. गावातील तंटे गावपातळीवरच मिटविणे, गावात एखादी घटना अथवा दुर्घटना घडली तर त्याची पोलिसांना वर्दी देणे, अशा स्वरूपाचे पोलीसपाटील यांचे काम असते. सध्या पोलीसपाटलांना महिन्याला शासनाकडून पाच हजार रुपये मानधन मिळते. (प्रतिनिधी)
पोलीसपाटील सद्य:स्थिती
उपविभागमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
करवीर१५५६३९२
इचलकरंजी१०२४९५३
राधानगरी-कागल१९८९९९९
गडहिंग्लज२२८२००२८
भुदरगड-आजरा२०२१३१७१
पन्हाळा२३३९५१३८
पोलीसपाटलांची जिल्ह्यासाठी १११८ पदे मंजूर आहेत. यापैकी फक्त ६३७ पदे भरली आहेत. तर अजून ४८१ पदे रिक्तआहेत.