शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

राज्यपाल राव यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५५ व्या दीक्षान्त समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 4:50 PM

नवस्नातकांनी पदवी, पदविका, प्रमाणपत्रे घेऊन नव्या युगात प्रवेश करीत असताना आपली वाणी आणि कृतीच्या संदर्भाने आपली पात्रता सिद्ध करावी, असे आवाहन तिरूचिरापल्ली येथील भारतीय प्रबंध संस्थानचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देनवस्नातकांनी वाणी आणि कृतीच्या संदर्भाने पात्रता सिद्ध करावी : भीमराया मेत्री सत्यजित पाटील, साक्षी गावडे यांचा सन्मानराज्यपाल राव यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५५ व्या दीक्षान्त समारंभ

कोल्हापूर : नवस्नातकांनी पदवी, पदविका, प्रमाणपत्रे घेऊन नव्या युगात प्रवेश करीत असताना आपली वाणी आणि कृतीच्या संदर्भाने आपली पात्रता सिद्ध करावी, असे आवाहन तिरूचिरापल्ली येथील भारतीय प्रबंध संस्थानचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शुक्रवारी येथे केले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, महाविद्यालयाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून आता तुम्ही प्रत्यक्ष जगात कार्यरत होणार आहात. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगात आपले भविष्य वेगळे असणार असून आपल्या भूमिका निश्चिपणे बदलणार आहेत. त्यामुळे निरंतर अध्ययन, बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करून कृतीशीलतेच्या जोरावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करा. शिवाजी विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षान्त समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. विद्यासागर राव होते. त्यांच्या हस्ते अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील सत्यजित पाटील याला सन २०१८-१९ मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. शिरोली पुलाची (ता. करवीर) येथील साक्षी गावडे हिला एम. ए. सामाजिकशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदका’ने सन्मानित केले.

नवीन विद्यापीठ कायद्यातील परिनियमानुसार यंदा या समारंभाच्या स्वरूपात बदल झाला. विद्यापीठातील अधिविभागांमधील पदवीधारकांनाच केवळ या समारंभात पदवी प्रदान करण्यात आल्याने स्नातकांची गर्दी कमी होती. उपस्थित स्नातकांमध्ये उत्साह दिसला, तरी समारंभातील बदल ठळकपणे जाणवत होता.डॉ. भीमराया मेत्री म्हणाले, डिजिटल युगातील विद्यार्थी हे ज्ञानयुगाचे वारकरी आहेत. जगातील सर्वाधिक तरूण महासत्ता असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक युवकाला जागतिक संधीची दारे खुली आहेत. आपल्याला आज माहित नसलेल्या संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. या संधी साधण्यासाठी उच्च प्रतीची कौशल्ये, ज्ञान, स्पर्धात्मकता, कृतीशीलता हे शब्द ध्यानात ठेऊन कार्यरत रहावे.या कार्यक्रमाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक महेश काकडे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. यावेळी शाहू छत्रपती, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आलोक जत्राटकर, धैर्यशील यादव, जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर