‘गोकुळ’साठी ५४ जण रिंगणात
By Admin | Updated: April 9, 2015 01:06 IST2015-04-09T01:03:02+5:302015-04-09T01:06:24+5:30
१६७ जणांची माघार : अरुंधती घाटगे, चौगुले, दिनकर कांबळेंंना डच्चू

‘गोकुळ’साठी ५४ जण रिंगणात
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या उमेदवारी अर्ज माघारीच्या बुधवारी या शेवटच्या दिवशी १६७ जणांनी माघार घेतली. १८ जागांसाठी ५४ जण रिंगणात राहिले असून, दुरंगी लढत होणार आहे. सत्तारूढ पॅनलमधून विद्यमान संचालक अरुंधती घाटगे, बाबासाहेब चौगुले, दिनकर कांबळे यांना डच्चू मिळाला.
पॅनल बांधणी करताना दोन्ही गटांनी कमालीची गुप्तता पाळल्याने शेवटपर्यंत इच्छुकांना अंदाज आला नाही. सत्तारूढ गटाचे पॅनल मंगळवारी रात्री निश्चित झाल्यानंतर नेत्यांनी आपल्या समर्थकांना माघारीसाठी संकेत दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी अकरापासून कार्यकर्ते माघारीच्या रांगेत थांबले होते.
सत्तारूढ गटाने दुपारी एक वाजता पॅनलची घोषणा केल्यानंतर माघारीसाठी झुंबड उडाली. दुपारी तीनपर्यंत १६७ जणांनी माघार घेतली. सर्वसाधारण गटातील १३ जागांसाठी ४१, महिला गटातील दोन जागांसाठी ५, अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठी दोन, तर भटक्या-विमुक्त व इतर मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी प्रत्येकी तीन अर्ज शिल्लक राहिले आहेत. २३ एप्रिलला मतदान होणार आहे.
या दिग्गजांची माघार
प्रकाश चव्हाण, सत्यजित जाधव, हिंंदुराव चौगले, धनाजी देसाई, दिनकर कांबळे, रामराजे कुपेकर, गणपतराव फराकटे, अजितसिंह घाटगे, सचिन घोरपडे, विद्याधर गुरबे, अरुण इंगवले, दौलतराव जाधव, पंडित केणे, किशाबापू किरुळकर, सुरेश कुराडे, हंबीरराव पाटील, ए. वाय. पाटील, के. एस. चौगुले, रघू पाटील (चिखलीकर), हंबीरराव वळके, पांडबा यादव.
शिल्लक अर्ज असे -
सर्वसाधारण गट : सरदार पाटील (आकुर्डे), उदय पाटील (सडोली खालसा), बाबासाहेब चौगले (केर्ली), अरुण डोंगळे (घोटवडे), चंद्रकांत बोंद्रे (फुलेवाडी), कृष्णात पाटील (वडकशिवाले), रवींद्र आपटे (उत्तूर), विजयसिंह मोरे (सरवडे), संग्राम पाटील (शिंगणापूर), सदानंद हत्तरकी (हलकर्णी), सत्यजित पाटील (सोनाळी), रघुनाथ घाटगे (कासारवाडी), किशोर पाटील (शिरोली दुमाला), अविनाश पाटील (राशिवडे), शशिकांत पाटील (चुये), धैर्यशील देसाई ( गंगापूर), बाजीराव पाटील (वडणगे), रणजितसिंह पाटील (मुरगूड), सुरेश पाटील (कसबा बीड), अरुण नरके (कसबा बोरगाव), दिलीपराव पाटील (शिरोळ), दीपक पाटील (बसर्गे), राऊसाहेब पाटील (वाकरे), अमरीशसिंह घाटगे (शेंडूर), सुरेशराव चव्हाण-पाटील (निट्टूर), बाबासाहेब शिंदे (शिंदेवाडी), वसंत खाडे (सांगरूळ), सदाशिवराव चरापले (कौलव), किरणसिंह पाटील (येवती), बाळासाहेब पाटील (दुंडगे), भूषण पाटील (वाळवे खुर्द), राजेश पाटील (म्हालेवाडी), मधुकर देसाई (म्हसवे), विश्वासराव पाटील (शिरोली दुमाला), बाळासाहेब कुपेकर (कानडेवाडी), भीमगोंडा पाटील (शिवारे), शंकर पाटील (शिवारे), अंजना रेडेकर (पेद्रेवाडी), सदाशिवराव नवणे (धामोड), अशोकराव पवार-पाटील (सडोली खालसा), राजेंद्र सूर्यवंशी (कसबा बीड). महिला : संजीवनीदेवी गायकवाड (सुपात्रे), अनुराधा पाटील (सरुड), अर्चना पाटील (कोथळी), हिराबाई पाटील (वाघराळी), जयश्री पाटील (चुये). अनुसूचित जाती/जमाती : चंद्रकांत गवळी (कागल), विलास कांबळे (कारिवडे) इतर मागासवर्गीय : पांडुरंग धुंदरे (राशिवडे), अंबाजी पाटील (येळवडे), शरद पाडळकर (कासारवाडा). भटक्या विमुक्त जाती : पांडुरंग बुवा-चव्हाण (कोथळी), विश्वास जाधव (कोडोली), नानासो हजारे (वाशी).