इचलकरंजीत ५३ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:43+5:302021-06-03T04:18:43+5:30

इचलकरंजी : शहरात विविध २४ भागांतील ५३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान दत्तनगर-भाटले मळा येथील ६७ वर्षीय ...

53 positive in Ichalkaranji; Death of one | इचलकरंजीत ५३ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजीत ५३ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात विविध २४ भागांतील ५३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान दत्तनगर-भाटले मळा येथील ६७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये स्वामी मळा ७, जवाहरनगर ६, गणेशनगर ५, शहापूर ४, विक्रमनगर व विवेकानंद कॉलनी प्रत्येकी ३, शेळके मळा, दत्त अपार्टमेंट, आरगे भवन, आमराई रोड, बंडगर माळ, यशवंत कॉलनी, भोनेमाळ येथील प्रत्येकी २, टिळक रोड, सांगली रोड, राजराजेश्वरीनगर, वर्धमान चौक, कापड मार्केटजवळ, जुना चंदूर रोड, तांबे मळा, सुर्वेनगर, गोकुळ चौक, काजवे हॉस्पिटलजवळ, सोलगे मळा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार ८३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सहा हजार ७ जण बरे झाले असून, ४८२ जण उपचार घेत आहेत. मृत्यूसंख्या ३४८ वर पोहोचली आहे.

Web Title: 53 positive in Ichalkaranji; Death of one