५२५ साई भक्तांना घडविले शिर्डीत साईदर्शन

By Admin | Updated: November 10, 2014 00:50 IST2014-11-10T00:50:37+5:302014-11-10T00:50:49+5:30

अनोखी सेवा : ओम साई मित्रमंडळ, मालघरचा उपक्रम

525 Sai devotees were created in Shirdi Sirdarshan | ५२५ साई भक्तांना घडविले शिर्डीत साईदर्शन

५२५ साई भक्तांना घडविले शिर्डीत साईदर्शन

चिपळूण : समाज सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे समजून अनेकजण समाजातील जडणघडणीमध्ये सहभाग घेत असतात. देवाला मानणारेही अनेकजण आहेत. हे नाकारुन चालणार नाही. संगणकीय युगातही देवधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साई भक्तांना साईबाबांचे दर्शन मिळावे, या भावनेतून ओम साई मित्रमंडळ, मालघरचे अध्यक्ष तुुषार खेडेकर यांनी ५२५ साईभक्तांना शिर्डी येथे स्वखर्चाने नेऊन एक अनोखा आनंद मिळवून दिला आहे.
कार्तिकी एकादशी, आषाढी आदींसह विविध धार्मिक सणामध्ये पंढरपूर, शिंगणापूर, कोल्हापूर महालक्ष्मी, बालाजी, शिर्डी आदी ठिकाणी जाण्याची परंपरा आजही कोकणाने अखंडपणे कायम ठेवली आहे.
अंधश्रद्धा नव्हे; तर श्रद्धेपोटी अनेकजण देवधर्माला अधिक महत्त्व देत असतात. दैनंदिन कामकाजातूनच एखाद्या दिवशी देवदर्शन करुन आत्मिक समाधान मिळावे म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारे प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी राज्यभरातून विविध प्रांतातील भाविक दररोज येत असतात. या ठिकाणी सार्इंच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगाही लागलेल्या असतात. अशा रांगेत उभे राहून साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय काही भक्त समाधान मानत नाहीत. ओम साई मित्रमंडळ, मालघरचे अध्यक्ष तुषार खेडेकर हे अवघे २५ वर्षांचे असून, ते सार्इंचे भक्त आहेत. छोटा व्यवसाय सांभाळून वेळ मिळेल तेव्हा ते साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.
आपल्याबरोबरच अनेकांना सार्इंचे दर्शन घेण्याची इच्छा असते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे काहींना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. ही जाणीव ठेवून खेडेकर यांनी शिरळ, मालघर, कोंढे, भोम, भागाडी, रामपूर, देवखेरकी, दोणवली, गुहागर तालुक्यातील पोमेंडी, धोपावे, धामापूर, तरवली आदी ग्रामीण भागातील ५२५ साईभक्तांना स्वखर्चाने शिर्डी येथे सार्इंच्या दर्शनास नेले. या ठिकाणी सर्व भक्तगणांनी तल्लीन होऊन साईबाबांचे दर्शन घेतले. ओम साई मित्रमंडळ, मालघरने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. (वार्ताहर)

पर्यावरण संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून मालघर येथे वृक्षारोपण करणे, सुंदर बाग, वृक्षसंवर्धन त्याचबरोबर स्वच्छतेवरही अधिक भर देणार असल्याचे तुषार खेडेकर यांनी सांगितले.

Web Title: 525 Sai devotees were created in Shirdi Sirdarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.