आयको स्पिनिंग मिलमध्ये ५२ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:48+5:302021-07-07T04:30:48+5:30
इचलकरंजी : 'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत इचलकरंजी को-आॅप.स्पिनिंग मिल (आयको) यांच्यावतीने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या ९० ...

आयको स्पिनिंग मिलमध्ये ५२ जणांनी केले रक्तदान
इचलकरंजी : 'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत इचलकरंजी को-आॅप.स्पिनिंग मिल (आयको) यांच्यावतीने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये ==????= महिलांचाही समावेश होता.
श्री आचार्य तुलसी ब्लड बॅँक जयसिंगपूर यांचे सहकार्य लाभले. आयको स्पिनिंग मिलचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 'लोकमत' च्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर सुरू होते. तुलसी ब्लड बॅँकेचे डॉ. राहुल पटेकरी, अरंजय शिरुटे, हेमलता मुंगसे, शैलजा पाटील, राहुल भोसले, सागर शिंदे, किरण पांडव यांनी शिबिराचे कामकाज पाहिले.
आमदार प्रकाश आवाडे व मिलचे अध्यक्ष मोहन भिडे यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मिलचे संचालक बाळासाहेब कलागते, परसोनेल व्यवस्थापक संजय चौगुले, युनियन अध्यक्ष प्रवीण केसरे, उपाध्यक्ष जहॉँगिर मुजावर, नंदकुमार पाटील, अशोक धातुंडे, दिलीप कुलकर्णी, मधुकर पोवार, जितेंद्र पगडे, 'लोकमत'चे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, इचलकरंजी कार्यालयप्रमुख अतुल आंबी, जाहिरात अधिकारी विक्रांत चौहान उपस्थित होते.
फोटो ओळी
०६०७२०२१-आयसीएच-०६ आयको स्पिनिंग मिल येथे झालेल्या महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संचालक बाळासाहेब कलागते, संजय चौगुले, प्रवीण केसरे, जहॉँगिर मुजावर, श्रीराम जोशी, अतुल आंबी, विक्रांत चौहान, अरंजय शिरुटे उपस्थित होते.