शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

वेश्या व्यवसायातील महिलांसाठी ५१ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 10:38 IST

coronavirus, kolhapurnews, prostitution , fund कोरोनाच्या काळातील वेश्या व्यवसायातील महिलांच्या उदरनिर्वाहाच्या परिस्थितीची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानुसार राज्य शासनाने अशा महिलांसाठी मुख्यमंत्री निधीतून ५१ कोटी १९ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी महिला आणि बालविकास विभागाने आदेश काढला.

ठळक मुद्दे कोविड कालावधीसाठी अर्थसाहाय्य एकतीस हजार महिलांना होणार लाभ

समीर देशपांडे कोल्हापूर : कोरोनाच्या काळातील वेश्या व्यवसायातील महिलांच्या उदरनिर्वाहाच्या परिस्थितीची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानुसार राज्य शासनाने अशा महिलांसाठी मुख्यमंत्री निधीतून ५१ कोटी १९ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी महिला आणि बालविकास विभागाने आदेश काढला.वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांची कोरोना काळामध्ये मोठी आर्थिक कोंडी झाली होती. याबाबत पश्चिम बंगाल राज्य सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्या निकालानुसार महाराष्ट्र सरकारने अशा महिलांना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून निधी देण्यााचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा निधी देण्यात येणार आहे.वेश्या व्यवसाय करून कुुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिक साहाय्य यासाठी जिल्हानिहाय प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी आयुक्त, महिला व बालविकास, पुणे यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.ओळखपत्र न मागता अर्थसाहाय्यराष्ट्रीय एड‌्स नियंत्रण संस्थेकडून वेश्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या आणि ओळख निश्चित केलेल्या महिलांना प्रतिमहिना पाच हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात, अशा महिलांना अतिरिक्त २५०० रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह धरू नये असेही शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.जिल्हावार मिळणारा निधीजिल्हा - महिला - बालके - अर्थसाहाय्य रुपये

  • कोल्हापूर ५०० - २४ - ७६ लाख ८० हजार
  • २ सांगली ९६० - ११४ - १ कोटी ५२ लाख ५५,००
  • ३ सातारा १५३ - ३४ - २५ लाख ५० हजार
  • ४ रत्नागिरी २२ - १२ - ४ लाख २० हजार
  • ५ सिंधुदुर्ग २५ - १६- ४ लाख ९५ हजार
  • ६ मुंबई शहर २६८७ - ५००- ४ कोटी ४० लाख
  • ७ मुंबई उपनगर २३०५ - ५०० - ३ कोटी ८३ लाख
  • ८ पुणे ७०११ - १००० - ११ कोटी २६ लाख
  • ९ नागपूर ६६१६ - २६१ - १० कोटी १२ लाख
  • १० औरंगाबाद १६८ - ० - २५ लाख २० हजार
टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायkolhapurकोल्हापूरGovernmentसरकारfundsनिधी