‘शाहूवाडी’तून स्मशानभूमीस ५० हजार शेणी, २० टन लाकूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:37+5:302021-05-17T04:22:37+5:30
कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी ...

‘शाहूवाडी’तून स्मशानभूमीस ५० हजार शेणी, २० टन लाकूड
कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन शाहूवाडी तालुक्याने स्मशानभूमीस शेणी व लाकूड दिले आहे. या शेणी व लाकूड शाहूवाडी येथून आणण्यासाठी घाटगे-पाटील ट्रासपोर्टचे तेजस घाटगे यांनी पाच ट्रक उपलब्ध करून दिले.
माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यातील छत्रपती मालोजीराजे ग्रुप यांच्या सहकार्याने अंत्यविधीसाठी लागणाऱ्या शेणी व लाकूड स्मशानभूमीस देण्याचे आवाहन तालुक्यातील गावोगावी जाऊन केले होते. तालुक्यातील शिराळा, खेडे, सोंडोली, थावडे, जांबूर, मालगाव, विरळे, पळसवडे, मालेवाडी, गोंडोलो, रेठरे, केर्ले, घोळसवडे, वारूळ, वालूर अवतूर, येलूरग्रुप ग्रामपंचायत शिरगाव, पेरीड, गाडेवाडी व नरहर तरुण मंडळ मलकापूरमधील ग्रामस्थांनी प्रतिसाद देत शेणी व लाकूड जमा करून दिले.
या उपक्रमास पैलवान रंगराव पाटील, तातोबा यादव, दामोदर भोसले, बाळकृष्ण पाटील, रंगराव पाटील, दत्तात्रय भोसले, गजानन पाटील, राजू केसरे,दिनेश पडवळ, आण्णा पाटील, विकास चव्हाण, प्रकाश पाटील, तानाजी भोसले, विकास बालतुगे, संजय भोपळे, धनाजी पाटील, सर्जेराव दादा प्रेमी, तालुक्यातील समाजसेवक, मंडळे यांचे सहकार्य लाभले आहे.
फोटो क्रमांक - १६०५२०२१-कोल-शाहूवाडी
ओळ - कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांतून महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस ५० हजार शेणी व २० टन लाकूड देण्यात आले.