गडहिंग्लजमध्ये ५० हजारांचे अमली पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:05+5:302021-09-18T04:26:05+5:30
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी (१६) सायंकाळी सहाच्या सुमारास अमोल हा बड्याचीवाडीनजीक शेंद्री तलावाजवळच्या रस्त्याच्या कडेला एमएच ४८ बीपी ...

गडहिंग्लजमध्ये ५० हजारांचे अमली पदार्थ जप्त
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी (१६) सायंकाळी सहाच्या सुमारास अमोल हा बड्याचीवाडीनजीक शेंद्री तलावाजवळच्या रस्त्याच्या कडेला एमएच ४८ बीपी ६८२२ क्रमांकाची मोपेड घेऊन थांबला होता. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याची पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान, त्याच्याकडे १ किलो ८८० ग्रॅम वजनाचा गांजासदृश आणि ८ ग्रॅम वजनाचा चरससदृश अमली पदार्थ आढळून आला. चौकशीत अरंबोळ गोवा येथील एका व्यक्तीकडून चरससदृश आणि कोल्हापूर येथील हरीश याच्याकडून गांजासदृश अमली पदार्थ त्याने विकत घेतल्याचे समजले. पोलिसांनी अमोलकडून ४४ हजार ५०० रुपये किमतीचे अंमली पदार्थ, रोख रक्कम, दुचाकी व मोबाइल मिळून १ लाख १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महेश गवळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके अधिक तपास करीत आहेत.