शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहीमेत यंदा ५०० युवकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 11:06 IST

'No Shave November' campaign, kolhapurnews "नो शेव्ह नोव्हेंबर" ही जगभरात सुरू असलेली एक व्यापक अशी मोहीम आता कोल्हापुरातील तरुणांनी सुद्धा हाती घेतली आहे. दाढीचे केस महिन्यासाठी वाढवून प्रतिकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. कोल्हापूरसह जिल्हाभरात कॅन्सर रुग्णांना या मोहिमेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे "नो शेव्ह नोव्हेंबर" मोहीम आता कोल्हापुरातयंदा ५०० युवकांचा सहभाग

कोल्हापूर : "नो शेव्ह नोव्हेंबर" ही जगभरात सुरू असलेली एक व्यापक अशी मोहीम आता कोल्हापुरातील तरुणांनी सुद्धा हाती घेतली आहे. दाढीचे केस महिन्यासाठी वाढवून प्रतिकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. कोल्हापूरसह जिल्हाभरात कॅन्सर रुग्णांना या मोहिमेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येणार आहे.

"नो शेव्ह नोव्हेंबर" ही मोहीम सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात १९९९ साली काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली होती. या मोहिमेला जगभरातून अनेक युवकांनी प्रतिसाद दिला आहे. याचेच अनुकरण कोल्हापुरातील काही तरुणांनी केले असून अशीच मोहीम सुरू केली आहे. दर्शन शहा, शेखर पाटील आणि त्यांच्या मित्रांनी ही मोहीम हाती घेतली असून गेले 2 वर्षात त्या सर्वांनी जवळपास 10 रुग्णांना पैशांच्या स्वरूपात मदत केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कॅन्सरचे हजारो रुग्ण आहेत. ते या आजाराच्या वेदना सहन करत आहेत. त्यांच्या वेदना तर वाटून घेता येत नाहीत. पण त्यांच्याबद्दल सहानुभूती तरी निश्चितच व्यक्त करता येऊ शकते. हा विचार दर्शन आणि शेखर यांच्या मनात आला आणि याच विचाराने त्यांनी ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक ग्रुप बनविला. त्यांच्या अन्य मित्रांनी सुद्धा या मोहिमेला पाठिंबा दिला.

सध्या जवळपास ५०० युवक यामध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक, वकील, इंजिनिअर आणि व्यावसायिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकजण जोडले गेले आहेत. महिनाभर दाढी करायची नाही, आणि त्यातून वाचणारी रक्कम जमा करून कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली घेतली आहे.

'नो शेव्ह नोव्हेंबर' या मोहिमेच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम 1 डिसेंबर रोजी संबंधित रुग्णांना देण्यात येते. या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांनी गेल्या 2 वर्षांपासून प्रतिसाद दिलाच आहे. यापुढेही कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी या मोहिमेला तरुणांनी हातभार लावावा असे आवाहन सुद्धा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.आपल्यालाही या मोहिमेत सहभागी होऊन कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करायची असेल तर या मुलांच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे असेल तर 7875707175 आणि 8999912008 नंबरवर संपर्क साधा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर