म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथे आमदार चषक राष्टÑीय कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. तीन दिवस चालणाºया या स्पर्धेत तब्बल ५00 हून अधिक मल्लांनी सहभाग घेतला आहे. आशियाई सुवर्णपदक विजेते, उपमहाराष्टÑ केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र्र पाटील-बानगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जय भवानी व हनुमान तालमीच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार के. पी. पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज घोरपडे, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, उमेश भोईटे, जगदीश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती रमेश तोडकर, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आॅलिम्पिकमधील गटाप्रमाणे २५, ३0, ३५, ४२, ४६, ५0, ५७, ६१, ६५, ७४ या दहा वजनी गटांसह खुल्या गटात लढती होत आहेत. पहिल्या सत्रात सलामीच्या लढतीत शुभम पाटील (म्हाकवे ) याने पृथ्वीराज पाटील (हनुमान आखाडा) याला १0-00 गुणांनी पराभूत केले. निखिल पोवार (बुद्धिहाळ) याने इचलकरंजीच्या ज्ञानेश्वर सावगावे याला ढाक डावावर चितपट केले. संजय पाटील (वाकरे) याने अहमदनगरच्या अजय घोलप याला १0-0६ गुणांनी पराभूत केले. भगतसिंग खोत (कुंभी कारखाना) याने येळवडेच्या मानसिंग पाटील याला भारंदाज डावावर चितपट केले. बानगेच्या वैभव पाटील याने इचलकरंजीच्या बिरू राऊत याला १0-00 गुणांनी चितपट केले. प्रताप पाटील (कोतोली) याने सद्दाम शेख याच्यावर १0-0६ गुणांनी विजय मिळविला.नामवंत मल्लांचा सहभागया स्पर्धेत खुल्या गटात राज्य, राष्टÑीय, आंतरराष्टÑीय पातळीवर चमकलेल्या नामवंत मल्लांनी सहभाग घेतला आहे. उपमहाराष्टÑ केसरी किरण भगत आणि नॅशनल चॅम्पियन दिल्लीचा गौरवकुमार यांच्यातील मुख्य लढत मातीमध्ये होणार आहे. त्याशिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेता कौतुक डाफळे, हर्षद सदगीर, सागर बिराजदार, कुमार पाटील, संतोष लवटे, योगेश बोंबाळे, माउली जमदाडे, विक्रम शेट्ये, आदी नामवंत मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
बानगेत आमदार चषक कुस्ती स्पर्धेला प्रारंभ ५०० मल्लांचा सहभाग;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:35 IST
म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथे आमदार चषक राष्टÑीय कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. तीन दिवस चालणाºया या स्पर्धेत तब्बल ५00 हून अधिक मल्लांनी सहभाग घेतला आहे. आशियाई सुवर्णपदक विजेते, उपमहाराष्टÑ केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र्र पाटील-बानगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जय भवानी व हनुमान तालमीच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले ...
बानगेत आमदार चषक कुस्ती स्पर्धेला प्रारंभ ५०० मल्लांचा सहभाग;
ठळक मुद्देतीन दिवस प्रकाशझोतात चालणार स्पर्धा