इचलकरंजीत ५० पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:02+5:302021-06-18T04:18:02+5:30
इचलकरंजी : शहरात गुरुवारी विविध २४ भागांतील ५० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान जय किसान चौक येथील ६५ ...

इचलकरंजीत ५० पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू
इचलकरंजी : शहरात गुरुवारी विविध २४ भागांतील ५० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान जय किसान चौक येथील ६५ वर्षीय वृद्ध, परीट गल्लीतील ४८ वर्षीय पुरुष व सहकारनगर येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सांगली रोड, मुरदंडे मळा, बालाजीनगर प्रत्येकी ५, गुजरी पेठ ४, मंगळवार पेठ ३, गावभाग, अष्टविनायक कॉलनी, दत्त कॉलनी, आसरानगर, संत मळा, गणेशनगर प्रत्येकी २, महालक्ष्मी चेंबर्स, बोहरा मार्केटजवळ, आरगे मळा, आमराई मळा, हत्ती चौक, बावणे गल्ली, हनुमाननगर, कृष्णानगर, दत्तनगर, योगाश्रम येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सात हजार ५५५ जणांना लागण झाली असून, सहा हजार ७७९ जण बरे झाले आहेत. ४०६ जणांवर उपचार सुरू असून, ३७० वर मृत्युसंख्या पोहचली आहे.