‘एमबीबीएस’च्या ५० जागांची वाढ
By Admin | Updated: June 4, 2016 00:57 IST2016-06-04T00:56:53+5:302016-06-04T00:57:55+5:30
शाहू वैद्यकीय महाविद्यालय : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पत्र

‘एमबीबीएस’च्या ५० जागांची वाढ
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’ श्रेणीच्या ५० जागांत वाढ केली आहे. यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी यशस्वी प्रयत्न केले. याबाबतचे पत्रक क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या रिक्त पदांबाबत व ‘एमबीबीएस’च्या वाढीव जागांबाबत क्षीरसागर यांनी पाठपुरावा केल्याने २०१५-१६ मध्ये ‘एमबीबीएस’च्या शंभर जागा वाढवाव्यात, अशी मागणी लावून धरली होती. यापूर्वी या महाविद्यालयाच्या ‘एमबीबीएस’च्या जागा वाढविण्याकरिता प्राध्यापक, साधनसामग्री तसेच या जागांसंदर्भात असणाऱ्या त्रुटी पूर्ण करून सुमारे ५० वाढीव जागा मंजूर झाल्याचे पत्र मिनिस्ट्री आॅफ हेल्थ, दिल्ली यांच्यातर्फे सीपीआर प्रशासनास प्राप्त झाले आहे. यापुढेही या वैद्यकीय महाविद्यालयात एम. एस. आणि एम. डी. पोस्ट-ग्रॅज्युएशन चालू होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे सीपीआर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अद्ययावत होण्यासाठी संबंधित खाते व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे. या अनुषंगाने राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)