शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अंबाबाईच्या किरणोत्सवात 'हा' मोठा अडथळा, महापालिकेकडून पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 13:22 IST

२८ पासून किरणोत्सव सुरू होणार हे गृहीत धरून देवस्थान समितीच्या वतीने नियोजन

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सात अजूनही ५ खोल्यांचा मोठा अडथळा आहे. या खोल्या वेगवेगळ्या मालकांच्या असून त्या काढण्याबाबत महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी महापालिकेकडे केली. यासह अन्य अडथळ्यांची यावेळी पाहणी करण्यात आली असून हे अडथळे २६ तारखेपर्यंत काढण्यात येणार आहेत.करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो, नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव ३० तारखेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महापालिकेकडे किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी महापालिकेतील अधिकारी मयूरी पटवेगार यांनी मंदिराला भेट दिली. यावेळी समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्यांना अडथळ्यांची माहिती दिली. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, विवेकानंद कॉलेजचे प्राध्यापक मिलिंद कारंजकर उपस्थित होते.किरणोत्सवाच्या मार्गात पाच वेगवेगळ्या इमारतींच्या वरच्या मजल्यावरील खोल्यांचा अडथळा आहे, जे मोठ्या स्वरुपाचे आहेत. त्या खोल्यांवर यापूर्वीच मार्किंग करण्यात आले आहे. याशिवाय ताराबाई रोडवरील काही दुकानांचा अडथळा आहे. दुकानांचे अडथळे २६ तारखेपर्यंत काढण्यात येणार आहेत. तसेच २७ तारखेला किरणोत्सवातील अडथळ्यांची पाहणी करण्यात येणार आहे. २८ पासून किरणोत्सव सुरू होणार हे गृहीत धरून देवस्थान समितीच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर